Breaking

रविवार, २४ एप्रिल, २०२२

घनश्याम शेलार यांचा वाढदिवस सोमवारी सत्काराला फाटा देऊन विविध उपक्रमाने साजरा होणार....


घनश्याम शेलार यांचा वाढदिवस सोमवारी सत्काराला फाटा देऊन विविध उपक्रमाने साजरा होणार....

श्रीगोंदा-नितीन रोही

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व राज्य साखर संघाचे संचालक मा. घन:शाम शेलार यांनी आपल्या समर्थक,हितचिंतक व आप्तेष्टांना सविनय आवाहन केले आहे की, “ गतवर्षी कोरोनाने सर्वत्र हाहाःकार माजवला होता. अनेकांनी जीवन-मरणाचा संघर्ष अनुभवला. असंख्य रूग्ण प्राणास मुकले. जवळपास प्रत्येकाने आपल्या निकटवर्तीयांपैकी कोणी ना कोणी गमावले. हे प्रचंड दुःख घेवून आपण नव्याने उभारी घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. ज्यांनी आई-बाबा गमावले, असे बरेच पाल्य आहेत. त्यांना नवी उमेद देण्याची गरज आहे. विशेषतः त्यांच्या शिक्षणासाठी यथाशक्ती हातभार लावण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे.”

वरील संदर्भाला अनुसरून मा. घनश्याम आण्णा शेलार यांनी वाढदिवसाचे सर्व सोपस्कार पूर्णपणे टाळण्याचा निर्णय घेतला आहे. शुभेच्छुकांनी हार-तुरे, शाली, फेटे, गुच्छ, फ्लेक्स आदींवर अनाठाई खर्च न करता त्याऐवजी शालेय शैक्षणिक साहित्य उदा वह्या, पेन, कंपास, दप्तर आधी चीजवस्तू यथाशक्ती आणाव्यात. हे सर्व साहित्य श्रीगोंदा येथे आण्णांच्या संपर्क कार्यालयात संकलित करण्यात येणार आहे. जमा झालेल्या या शैक्षणिक साहित्यात तितक्याच किमतीचे साहित्य शेलार कुटुंबीय स्वखर्चाने देणार आहे. हे सर्व साहित्य वर उल्लेखित गरजूंना ठिकठिकाणी वितरित केले जाईल. हे करताना फोटो, व्हिडिओ किंवा अन्य प्रसिद्धी कटाक्षाने टाळली जाईल. एखाद्यास मदत करताना त्याच्या आत्मसन्मान व स्वाभिमानास ठेच लागू नये, म्हणून हे टाळले आहे.

कोरोना चे संकट तूर्तास नसणे ही समाधानाची बाब आहे. तरीपण सावधगिरी बाळगावी लागणार आहे. लस न घेतलेल्या घटकांना लसीकरणात सामील करून घेणे बूस्टर डोस वैद्यकीय सल्ल्याने मिळवून देणे याकामी विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे श्री. शेलार यांनी म्हटले आहे.

फोटो,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा