Breaking

रविवार, २४ एप्रिल, २०२२

राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धेत अर्णव कदम राज्यात तृतीय*



*राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धेत अर्णव कदम राज्यात तृतीय* 


वडूज प्रतिनिधी 

         जि.प.प्राथमिक शाळा वडूज नं.१ मधील इयत्ता ४ थी मधील विद्यार्थी कु.अर्णव सचिन कदम याने शिवाजी भोसले एज्यूवर्ल्ड या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाइन गीत गायन स्पर्धेत राज्यात तृतीय क्रमांक पटकावला.एकूण पाच गटांमध्ये हि स्पर्धा झाली असून गट क्रमांक २ मधून अर्णव कदम यांने तृतीय क्रमांक मिळविला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सावित्री जगताप, वर्गशिक्षिका सौ.संगिता सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शाळेच्या वतीने अर्णवचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक शिवाजीराव खाडे, सौ.रेखा देशमुख, उमेश पाटील, सुहास खाडे, सतिश खाडे, नंदराज हाडस उपस्थित होते. अर्णव कदम भुरकवडी सोसायटी माजी चेअरमन शरदराव कदम यांचा नातू असून अर्णवच्या या यशाबद्दल केंद्रप्रमुख श्री तुकाराम यादव, विस्तार अधिकारी लक्ष्मणराव पिसेसाहेब, गटशिक्षणाधिकारी श्रीमती प्रतिभा भराडे, प्रा.एन.एस.उर्फ बंडा गोडसे सर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे, माजी सभापती संदिप मांडवे, येरळा परिवार अध्यक्ष धनंजय क्षीरसागर, सरपंच ललिता कदम, शिवाजीराव कदम, सुरेश गोडसे यांनी अभिनंदन केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा