*शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते सलीमा सय्यदचा सत्कार*
औसा प्रतिनिधी:*ज्ञानेश्वर सूर्यवंशी*.
लातूर शहरातील यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन प्राथमिक माध्यमिकचा 2021 - 22 वार्षिक अहवाल सादरिकरणात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल शिक्षक आमदार विक्रमजी काळे साहेब यांनी आदर्श मुख्याध्यापिका सलीमा सय्यदचा व त्यांच्या सहकार्यांचा शाल पुष्पहार देवून सत्कार केला.
केएसपीएम संस्थेचे आध्यक्ष दयानंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य गंगाधर हिंगोले,संस्थेचे उपाध्यक्ष माजी कुलगुरू मधुकरराव गायकवाड,कोषाध्यक्ष प्राचार्य अनिल काळे ,सदस्य डाँ.रणविर काळे यांच्या उपस्थितीत 2021 - 22 वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. लातूर जिल्हा व उस्मानाबाद जिल्ह्यातील एकूण 21 शाळा महाविद्यालय सहभागी झाले होते.द्वितीय आला .समता विद्यालय जोडजवळा प्राचार्य किसन बिरादार,त्रतीय आला राजर्षी शाहू विद्यालय गौर मुख्याध्यापक संजय राठोड. प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रझेनटेशन,पी पी टी,डिजीटल अहवाल सादर केला.
अध्यक्षीय समारोपात शिक्षक आमदार विक्रम काळे म्हणाले सय्यद मँडमनी सर्व छोटे मोठे कार्यक्रम घेतले अनेक उपक्रम राबवले.सोशल मिडियात आहेत त्यांच्या बातम्या वाचत होतो.यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन शाळेच्या 69 वर्षभरात बातम्या आल्या आहेत .कार्यक्रमाचे व्हिडिओ युट्यूब चायनलवर अपलोड केले आहेत सबंध महाराष्ट्रातून व भारतातून व्हीवज आल्या आहेत.त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील काम हे वाखाण्याजोगे आहे.असे ते म्हणाले
प्रास्ताविक सलीमा सय्यद यांनी केला.त्या म्हणाल्या वर्षभर केलेल्या कामाचा अढावा घेण्यासाठी ही मिटींग आयोजीत केली आहे.वर्षभर केलेल्या कामाचा उहापोह व्हावा.तसेच वार्षिक अहवाल वर्षभर केलेल्या कामाचा आरसा आहे.विद्यार्थ्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हायला हवी.दोन वर्ष कोरोना असल्यामुळे विद्यार्थ्यांना लिहता वाचता येत नाही.त्यांचा बेसिक पक्का केला पाहिजे.अस त्या म्हणाल्या.
सूत्रसंचलन महादेव कांबळे यांनी केले तर आभार सय्यद सलीमा यांनी मानले.
यावेळी सर्व शाळेचे मुख्याध्यापक,प्राचार्य ,डाँक्टर,प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा