भुरकवडी सोसायटीचा बिनविरोधचा षटकार
चेअरमनपदी दिलीप कदम तर व्हा. चेअरमनपदी साहेबराव कदम
वडूज प्रतिनिधी
खटाव तालुक्यातील भुरकवडी विकास सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली. गटतट बाजूला ठेवून भुरकवडीकरांनी गेली ३० वर्षाची बिनविरोधची परपंरा कायम ठेवली. ग्रामपंचायतीबरोबर सोसायटीचीही निवडणूक सलग सहाव्यांदा बिनविरोध करून षटकार मारला आहे. यावेळी सोसायटीच्या चेअरमनपदी दिलीप आनंदराव कदम यांची तर व्हा.चेअरमनपदी साहेबराव गुलाबराव कदम यांची निवड करण्यात आली. चेअरमन दिलीप कदम यांच्यासाठी सूचक शहाजी दत्तू कदम यांनी तर अनुमोदन श्रीमंत बापू कदम यांनी दिले, व्हा चेअरमन साहेबराव कदम यांना सूचक जालिंदर दादा कदम यांनी तर अनुमोदन लता नंदकुमार कदम यांनी दिले. या निवडीवेळी संचालक तानाजी बाबूराव कदम, शिवाजी वामन कदम, धनाजी भानुदास कदम, कैकई सदाशिव चव्हाण उपस्थित होते. १३ पैकी १० संचालक असून उर्वरीत तीन जागा उमेदवारा अभावी रिक्त राहिल्या आहेत. निवडणुक निर्यण अधिकारी म्हणून स्वप्निल माळी यांनी काम पाहिले तर सचिव असलम पठाण यांनी त्यांना सहकार्य केले.
यावेळी जेष्ठ कार्यकर्ते माजी सरपंच शिवाजीराव कदम, एस के कदम सर, सरपंच ललिता कदम, सोसायटीचे माजी चेअरमन शरदराव कदम, विजयदत्त कदम, मधुकर कदम, छगनराव कदम, कैलासराव जाधव, दादासो पाटील, सदाशिव चव्हाण, आप्पासो कदम, शिवाजी कदम, संतोष कदम, भानुदास सस्ते, बाळासो कदम, सुखदेव फडतरे, हणमंत गाढवे आदि उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा