बसव जयंतीनिमित्ताने किलज येथे कार्यक्रमाचे आयोजन.
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद
तुळजापूर तालुक्यातील किलज येथे दि.३ मे २०२२ ते दि.६ मे २०२२ या दरम्यान महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये दि.३ मे रोजी महात्मा बसवेश्वर यांच्या मूर्तीची स्थापना केली जाणार आहे.तसेच किलज मध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.व सायं.डॉ.संतोष पवार यांचे महात्मा बसवेश्वर यांच्या विषयावर आधारित भव्य व्याख्यान होणार आहे.तसेच दि.४ मे रोजी सायं.दिनकर कदम यांचा भारुड कार्यक्रम रंगणार आहे.दि.५ मे रोजी मारुती भालके(जांब जळकोट) यांचे भव्य कीर्तन होणार आहे.तसेच दि.६ मे रोजी महापूजा,महाप्रसाद आणि जंगी मिरवणूकीने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.तरी किलज तसेच परिसरातील गावातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवा ग्रुप किलज यांच्या तर्फे सर्वाना करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा