Breaking

रविवार, १ मे, २०२२

उमरा येथे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा



उमरा येथे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा


नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

लोहा: उमरा येथे ग्रामपंचायत कार्यालय तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,किसान विद्यालय येथे १-मे- महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६२ वा वर्धापनदिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

उमरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष चेतन पाटील सिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रशासक डी.एच.देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.किसान विद्यालय येथे मुख्याध्यापक एस.आर.मुंगल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन मधुकरराव सिरसाट,आनंदराव सिरसाट,नागोराव सिरसाट,नारायणराव पुयड,आनंदराव वाघमारे,रामेश्वर सिररसाट,माधव शिंदे,विजय पांचाळ प्रल्हाद शिंदे,पिराजी ढगे जि.प.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक व्ही.व्ही.अमनवाड,एम.जी.मेथे,आर.आर.वंगलवार,मारोती पवळे, मुबिन शेख, चंद्रकांत वाघमारे,रावसाहेब गंगातिरे यांच्यासह ग्रामस्थ आदी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा