राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी संघटनेची किनवट तालुका कार्यकारिणी जाहीर
तालुकाध्यक्ष पदी श्रीमती.रत्नमाला नागभीडे तर सचिव पदी ए.आर.शेख यांची निवड
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
किनवट : दि.१५-मे -रोजी उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा,किनवट येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी संघटनेची बैठक जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ थोरात जिल्हा सचिव प्रदीप देशमुख संपर्कप्रमुख संजय देशमुख राजू गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
सदर बैठकीत जिल्हा पदाधिकाऱ्यांनी संघटना बळकट करण्यासाठी व कंत्राटी कर्मचाऱ्यांवर होत असलेला अन्याय आणि प्रलंबित मागण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.आमचे हक्क मिळवण्याकरिता आम्ही किनवट तालुक्यातील कंत्राटी कर्मचारी खंबीरपणे संघटनेच्या सोबत पूर्ण ताकतीने उभे राहू.असा एकमताने निर्णय घेण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी संघटनेची किनवट तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.यामध्ये किनवट तालुकाध्यक्ष पदी श्रीमती.रत्नमाला नागभिडे,सचिव पदी ए.आर.शेख,उपाध्यक्ष सी.एम.सोंडारे,श्रीमती.वाघमारे, प्रदीप शिंदे,सहसचिव सपना राठोड,डिंपल पवार,सल्लागार प्रदीप देशमुख,संपर्क प्रमुख पंकज राठोड,रेश्मा ढोरे प्रसिद्धी प्रमुख यशोदा मडावी निमघडे सरिता,कोकाटे एच.डी कार्याध्यक्ष राठोड जयश्री,मेश्राम कोषाध्यक्ष काकडे जे.बी सहकोषाध्यक्ष मनीषा शिंदे,कोकुलवाड मीरा आदींची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जे.बी काकडे यांनी केले तर बैठकीचे आभार ए.आर.शेख यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा