*बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किसन खोचरे यांची एकसष्ठी साजरी.....*
कन्हेरगाव प्रतिनिधी......
निवृत्त पी एस आय व हरितक्रांती पाणी पुरवठा संस्थेचे चेअरमन किसनराव खोचरे यांचा एकसष्टी चा कार्यक्रम विविध उपक्रमांनी कन्हेरगाव येथे साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम प्राथमिक शाळा कन्हेरगाव येथे शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी मा.सरपंच लिंबाजी मोरे यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
कन्हेरगाव येथील खोचरे वस्ती येथे किसन आप्पा खोचरे यांच्या एकसष्ठी च्या कार्यक्रमानिमित्त विठ्ठल गंगा विठ्ठल गंगा चे संस्थापक चेअरमन श्री धनराज दादा शिंदे यांचे उपस्थितीत व कनेरगाव चे माजी सरपंच श्री लिंबाजी नागनाथ मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सत्काराचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मोरे साहेब यांनी किसन आप्पा खोच रे यांना दीर्घायुष्य मिळावे व त्यांच्या हातून अशा स्वरूपाची समाज उपयोगी कामे व्हावी अशा स्वरूपाच्या शुभेच्छा दिल्या याशिवाय धनराज शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये किसन खोचरे यांना दीर्घायुष्याची शुभेच्छा व्यक्त केल्या. या वेळी अमित किसन खोचरे व प्रमोद खोचरे यांचाही वाढदिवसानिमित सत्कार करण्यात आला.याशिवाय रामभाऊ शिंदे भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे काँग्रेसचे दीपक खोचरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते नागनाथ हांडे संचालक दत्ता माने पोपट पाटील पोपट केदार टेंभुर्णी चे ग्रामपंचायत सदस्य विकास धोत्रे प्रदीप केदार, नानासाहेब नवले, नागनाथ मोरे सर हे आवर्जून उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोसायटी संचालक उमेश डोके, संचालक प्रतिनिधी बाबाराजे केदार,रामलिंग खोचरे ,माजी उपसरपंच दादासाहेब खोचरे गणेश चे संचालक किरण खोचरे, बळीराजा शेतकरी जिल्हा संघटक बाबुराव दादा डोके युवा जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ डोके पंडित नाना पाटील विकास पाटील यांनी प्रयत्न केले
यावेळी कार्यक्रम प्रसंगी अकोलेचे मा.सरपंच महादेव घाडगे अँड रणजीत पाटील ,अरुण पाटील दहिवली चे माजी सरपंच अरुण पाटील, राहुल पाटील ,विजय माने ,विलास केदार , अप्पा डोके ,अमोल लोंढे, योगेश खोचरे विनोद खोचरे पंकज खोचरे सचिव देविदास डोके सोसायटीचे संचालक जयवंत पाटील ,हर्षवर्धन माने ,महेश माने नानासाहेब माने ,सौरभ माने, संतोष भरगंडे ,तुषार भरंगडे, बापूराव काशीद ,उत्तम पाटील, संजय पाटील ,सतीश खोचरे, सुरेश पाटील ,खंडु डोके ,निलेश ताटे,सचिन दोशी, गजानन मोरे, सनी मोरे ,गणेश जाधव ,काका खोचरे,काका सरडे ,भाऊ माने,भाऊ डोके, यांनी परिश्रम घेतले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा