बंजारा समाजातील युवकांनी शिक्षणाला प्रथम प्राधान्य देऊन जनजागृती करावी- संत शेखर महाराज
प्रतिनिधी:- अजित चव्हाण
नळदुर्ग:- बंजारा समाज हा कष्टकरी समाज असून समजातील युवकांनी शिक्षणाला प्रथम प्राधान्य देऊन समाजात जनजागृती करण्याचे आवाहन पोहरादेवी संस्थानचे शेखर महाराज यांनी केले.
नळदुर्ग येथील वसंतनगर या ठिकाणी श्री. सेवालाल व जगदंबा देवी मंदिरात शेखर महाराज यांचे हस्ते पूजा करून प्रसादाचे वाटप करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. प्रारंभी शेखर महाराज यांचे वसंतनगर येथे आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले.
वसंतनगर येथील सेवालाल व जगदंबा मंदीराचे नव्याने जिनोद्धर करण्यात आल्याने मंदीरात शेखर महाराज श्रीफळ वाढवून पूजा करण्यात आली.
यावेळी उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. बंजारा समाज हा व्यसनमुक्त झाले पाहिजे असे आवाहन शेखर महाराज यांनी बंजारा समाजातील नागरिकांना केले. तसेच शेखर महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांना प्रचंड अशी गर्दी केली होती. यावेळी वसंतनगर येथील पंच कमिटीच्या वतीने शाल, पुष्पहार, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी रवी महाराज, नगरसेवक निरंजन राठोड, पत्रकार अजित चव्हाण, नगरसेविका छमाबाई राठोड, माजी नगराध्यक्ष झिमाबाई राठोड, फुलचंद राठोड, मानसिंग राठोड, विनायक जाधव, मोतीराम राठोड, भानुदास राठोड, रामा राठोड, बाबू राठोड, संजय जाधव, कनिराम राठोड, चांगदेव चव्हाण, दिलीप राठोड, दत्ता राठोड, विशाल जाधव, गणेश राठोड, आकाश जाधव समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा