Breaking

मंगळवार, १० मे, २०२२

मित्राच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करून श्रद्धांजली अर्पण...


**मित्राच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करून श्रद्धांजली अर्पण...*


 

टेंभुर्णी प्रतिनिधी-
7 मे 2021 रोजी मागच्या वर्षी महेश दादासाहेब पिंगळे यांचे अपघाताने निधन झाले.लहान मुले,आई-वडील,भाऊ असा परिवार पोरका झाला .तेव्हा त्याच्या बालपणीचे इयत्ता दहावीतील बॅच 2003 मधील मित्रांनी एकत्र येऊन एक लाख तीस हजार रुपयांची एफ डी त्याच्या दोन मुलींच्या नावाने बँकेत केली. बँक खात्यातील एफडीच्या पावत्या चिमुकलीच्या व आईच्या हाती सुपूर्द करण्यात आले. 7 मे 2022 रोजी वार -शनिवार रोजी बापूच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झाले.इयत्ता दहावीतील बॅच 2003 मधील सर्व मित्रांनी एकत्र येऊन त्याच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या रक्तदान शिबिरामध्ये एकूण 86 जणांनी रक्तदान केले.रक्तदान संकलन करण्यासाठी कुर्डूवाडी ब्लड बँकेने सहकार्य लाभले.तसेच महेश पिंगळेचा मोठा भाऊ अविनाश पिंगळे आणि त्याच्या मित्रपरिवाराचे सहकार्य लाभले.आपल्या लाडक्या मित्राच्या पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून दहावीतील मित्रांनी रक्तदान करून श्रद्धांजली अर्पण केली.या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे समाजातून विशेष कौतुक करण्यात आले यासाठी दहावी बॅच 2003 मधील सर्व मित्रांचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा