माजी आमदारांच्या गावात जबरी चोरी....
चोर मोटारसायकल सोडून पळाले....
श्रीगोंदा-नितीन रोही
तालुक्यातील बेळवंडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पिंपळ गाव पिसा येथील शेतकरी बाळू दादा पवार (सपाटे वस्ती)यांच्या घरी रात्री 11/30वाजता जबरी चोरी करत करून चोरटे पसार झाले. सदर ठिकाणी अज्ञात चोरटे मोटारसायकल व पायातील चप्पल सोडून निघून गेले असल्याची माहिती पोलिसांना फिर्यादी बाळू पवार यांनी दिली आहे. गुन्ह्यात वापरलेले हत्यार- दगड ,गज गुन्ह्यात वापरलेले वाहन- मोटर सायकल MH 12 QD 5543
गेला माल - 5,95,00 रु. किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व 4000 रु.रोख रक्कम
फिर्यादीचे घरासमोरील घराची लाईट बंद करून दगडफेक करून फिर्यादीचे वडिलांना गजाणे काठीने मारहाण करून त्यांचे हाताला दुखापत करून साक्षीदार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांचे गळ्यातील मंगळसूत्र व पायातील जोडवे बळजबरीने काढून असा एकूण 59500 रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चार चोरट्यांनी बळजबरीने स्वतःचे फायद्याकरता चोरून नेऊन दुखापत करून त्यांची मोटरसायकल त्याच ठिकाणी सोडून पळून गेले आहेत व इतर साक्षीदार यांचे घरी चोरी करून पळून गेले आहे. फिर्यादीवरून त्यावर गु. र जि.नं व कलम -गु.र.नं-1-1 84/2022 भा.द.वि.कलम-394,34 प्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पो नि दुधाळ,
स.फौ आर टी शिंदे यांनी भेट दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक दुधाळ करीत आहेत.
*आव्हान*
बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांना पोलीस निरीक्षक दुधाळ साहेब यांनी आवाहन केले आहे की पोलीस विभाग हे रात्रीच्या वेळी प्रभावी गस्त करत आहेत.
असे प्रकार होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा वेळोवेळी करत आहोत.
एक दक्ष नागरिक म्हणून गावातील नागरिकांनी आपल्या गावातील ग्राम सुरक्षा यंत्रणा व ग्रामसुरक्षा दल हे दोन्ही सुरू करावे जेणेकरून अशाप्रकारे चोरीच्या घटना होणार नाहीत.
गावात येणारे अनोळखी इसम व संशयास्पद फिरणारे व्यक्ती यांची माहिती तात्काळ स्थानिक पोलिस स्टेशनला कळवावी .
गावातील काही तरुण युवकांनी पुढे येऊन रात्रीच्या वेळी गावांमध्ये गस्त केल्यास अशा घटना टळतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा