रविना यादवला Yuva 360° सन्मान व गुणगौरव पुरस्कार जाहीर.
रविना आनंदकुमार यादव ही आपल्या कार्यक्षेत्रात मोठ्या कष्टाने व जिद्दीने नवीन वाटा शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. अनेक आव्हानांवा सामना करत, कष्ट, चिकाटी आणि अथक प्रयत्नांच्या जोरावर उल्लेखनीय यश प्राप्त करण्याचा तीचा सदैव प्रयत्न राहिलेला आहे. रविनाच्या उल्लेखनीय कार्याच्या माध्यमातून स्वतःचे, आपल्या कुटुंबाचे,तालुक्याचे पर्यायाने आपल्या सातारा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
रविनाचे कार्य स्वतःसाठी व इतरांसाठी प्रेरणादायी ठराव म्हणून श्रीनिवास पाटील फाउंडेशन, सातारा। चा "Yuva 360° सन्मान व गुणगौरव' पुरस्कारासाठी रविना आनंदकुमार यादव हिची निवड करण्यात आली आहे, Yuva 360" ला रविनाचा सार्थ अभिमान आहे. दि.२२/५/२०२२ रोजी Sunbeam IT Park, 108 बँक शेजारी, प्लॉट नं 9/3-4 MIDC गोडोली, सातारा-४ येथे सकाळी ९:३० वाजता पुरस्कार वितरण सोहळा मा.श्री.सारंग श्रीनिवास पाटील, अध्यक्ष युवा ३६०° यांच्या हस्ते या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.
रविना यादव ही वडूज मधील दादासाहेब जोतिराम गोडसे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयामध्ये इंग्लिश डिपार्टमेंट मध्ये शिकत आहे. तीला जाहीर झालेल्या या पुरस्कारमुळे महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ. एस.बी.पाटील, उपप्राचार्य.डॉ.सविता गिरे,तसेच सर्व प्राध्यापकांनी तीने अभिनंदन केले. व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा