सोसायटी निवडणुकीसाठी मनसेकडून हालचाली चालू
प्रतिनिधी:- अजित चव्हाण
नळदुर्ग:- विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी निवडणूक नुकतीच जाहिर झाली असून, या अगोदर सात वर्षा पूर्वी ही निवडणूक झाली होती. कोविड-१९च्या पार्श्वभूमिवर सहकारी संस्थेच्या निवडणुका लांबनीवर टाकल्या होत्या व आहे त्या संचालक मंडळास मुदत वाढ दिली होती. कोविडची लाट कमी होताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा उपनिबंधक यांच्या निवडणुक कार्यक्रम घ्या अशी मागणी करण्यात आली होती. गेल्या एक-दोन महिन्यापासून मनसेकडून या निवडणुकीसाठी चाचपणी सुरु होती. आता या प्रक्रियेस मनसेने वेग वाढविला असून मनसेने स्वतंत्र पॅनल उभे केल्यास अनेकजन इच्छुक असून आता पक्षाच्या बैठकीत काय ठरते यावर अवलंबुन आहे. गत निवडणूकित सत्ताधारी पॅनलला मनसेचा बिनशर्त पाठींबा दिला होता. त्यामुळे यावेळी मनसे स्वतंत्र पॅनल उभे करते का? कोणासोबत पॅनल मध्ये सहभागी होते,याकडे लक्ष लागले आहे. यावर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी लवकरच जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत निर्णय व भूमिका जाहिर करणार असल्याचे सांगितले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा