Breaking

रविवार, १५ मे, २०२२

धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठाणच्या खेळपैठणीची मानकरी कु.मेहेक शेख


धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठाणच्या खेळपैठणीची मानकरी कु.मेहेक शेख



करमाळा  (प्रतिनिधी) 
येथील धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीने खेळ पैठणीच्या स्पर्धेत कु.मेहेक आशपाक शेख हिचा प्रथम क्रमांक मिळाला मेहेक शेख हिस मानाची पैठणी देवून गौरविण्यात आले. 
धर्मवीर संभाजीराजे जयंतीनिमत् धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठाच्या वतीने आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे उद्घाटन तारामती दादासाहेब घोलप, बांधकाम समिती सभापती स्वाती फंड, मुख्याध्यापिका माया भागवत, यांच्या हस्ते करण्यात आले.  
या कार्यक्रमामध्ये 120 महिलांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये महिलांसाठी होम मिनिस्टरचे सर्व खेळ घेण्यात आले. या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक सौ.माधुरी परदेशी, व तृतीय क्रमांक कु.वैष्णवी संतोष शिंतोळे याची क्रमांक आला त्यांना प्रत्येक मिक्सर व सोन्याची नथ देवून सन्मानित करण्यात आले. 
या स्पर्धेमध्ये लहान मुलांसाठी घेण्यात आलेल्या संगीत खुर्ची स्पधर्मेमध्ये  प्रथम क्रमांक अमन इम्रान पठाण व लिंबु चमच्या स्पर्धेमध्ये कु.प्राजंली रतिराज जानराव हिचा प्रथम क्रमांक आला यांना चषक देवून सन्मानित करण्या आले.
खेळ पैठणीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे दिग्विजयभैय्या घोलप यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी बहुसंख्ये महिलांनी सहभाग घेवून स्पर्धा यशस्वी केली. यावेळी धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठाचे अध्यक्ष संजयबापु घोलप, संस्थापक विनयकाका ननवरे, नगरसेवक प्रविणआबा जाधव, यशकल्याणीचे अध्यक्ष गणेशभाऊ करेपाटील, नगरसेवक अतुल फंड, नगरसेवक महादेव फंड, संतोष वारे, आदि उपस्थितीत होते. 
चौकट 
धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित केलेल्या खेळ पैठणीचा कार्यक्रम हा महिलांसाठी आपल्या घरातील दैनंदिन कामाच्या व्यस्त् असल्याने त्यांना थोडासा दिलासा देण्यासाठी खेळपैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीने आजपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम घेवून महिला सन्मान व प्रोत्साहन देण्यात येते. धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठाण दरवर्षी गणेशत्सवामध्ये मिरवणूकीच्या खर्चाला फाटादेवून शिल्लक वर्गणीचा वापर समाज्यातील गरजू लोकांसाठी केला जातो. 
दिग्विजयभैय्या घोलप, युवानेते, धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठाण, करमाळा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा