कु साक्षी रघुनाथ जगताप हिचा 12 वी कला शाखेत तालुक्यात प्रथम क्रमांक संपादन केल्याबद्दल मराठा सेवा संघाकडून सत्कार
करमाळा प्रतिनिधी
कु साक्षी रघुनाथ जगताप हिचा 12 वी कला शाखेत तालुक्यात प्रथम क्रमांक संपादन केल्याबद्दल मराठा सेवा संघाकडून सत्कार करण्यात आला.साक्षीला 91% गुण मिळाले असून इतिहास विषयात ती बोर्डात प्रथम आली आहे.
साक्षीला इतिहास विषयात 97 गुण मिळाले आहेत. करमाळा येथील नामांकित पशुखाद्य व्यावसायिक रघुनाथ जगताप यांची साक्षी ही कन्या आहे.तिच्या या दैदीप्यमान यशाबद्दल करमाळा तालुका मराठा सेवा संघाकडून साक्षीच्या निवासस्थानी करमाळा येथे सत्कार करण्यात आला. यावेळी मराठा सेवा संघ माजी तालुकाध्यक्ष प्रा नागेश माने,तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील, शिक्षक नेते बाळासाहेब गोरे गुरुजी, दिगंबर साळुंके बापू ,माजी सहाय्यक आयुक्त बाळासाहेब जगताप, अण्णासाहेब जगताप विद्यालय माजी मुख्याध्यापक पांडुरंग वीर,बारामती ऍग्रोचे राऊत,कैलास मस्कर,दत्तात्रय मस्कर,रघुनाथ जगताप आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा नागेश माने यांनी साक्षीचे कौतुक करत बहुजन समाजातील मुली व मुलांनी असेच उत्तुंग यश मिळवून माता पित्यांचे स्वप्न साकार करण्याचे आवाहन केले.
भविष्यात असाच अभ्यास करत केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन क्लास वन अधिकारी बनण्याचा मनोदय साक्षी हिने सत्काराला उत्तर देताना बोलून दाखवला. माजी सहाय्यक आयुक्त बाळासाहेब जगताप यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर रघुनाथ जगताप यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा