Breaking

सोमवार, २० जून, २०२२

तीन लाखाच्या नव्या ट्रॅक्टरची शेलगाव वांगी येथून चोरी: पोलीसात गुन्हा दाखल, चोरी होऊन पाच दिवस झाले तरी तपास लागेना



तीन लाखाच्या नव्या ट्रॅक्टरची शेलगाव वांगी येथून चोरी: पोलीसात गुन्हा दाखल, चोरी होऊन पाच दिवस झाले तरी तपास लागेना



करमाळा:  प्रतिनिधी 
शेलगाव वांगी तालुका करमाळा येथील घरासमोर लावलेल्या तीन लाख रूपये किमंतीच्या नवीन ट्रॅक्टरची चोरी झाली आहे. 
याची फिर्याद संग्राम संभाजी पाटील (वय30) रा.शेलगाव वांगी यांनी करमाळा पोलिसांत दिली आहे. 
याबाबतची हकीकत अशी की, दि 15 रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास  ट्रॅक्टर चालक नवनाथ कोडंलकर यांनी ट्रॅक्टर मालक संभाजी पाटील यांच्या घरासमोरील लिंबाच्या झाडाखाली ट्रॅक्टर लावला होता. मात्र अज्ञात चोरट्यांनी तीन महिन्यांपूर्वीच नवीन आणलेला ट्रॅक्टर रातोरात गायब केला आहे . ट्रॅक्टर चोरी होऊन पाच दिवस झाले तरी पोलिसांकडून कसलाही तपास लागेना.  याबाबत संग्राम पाटील यांनी सर्वत्र चौकशी केली मात्र ट्रॅक्टर न सापडल्याने संग्राम पाटील यांनी अज्ञात चोरट्यांनी  ट्रॅक्टर चोरीला नेल्याचे  पोलिसांत तक्रार दिली आहे. करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस उपनिरीक्षक प्रवीण साने हे पुढील तपास करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा