रावसाहेब नाना मित्र परिवाराचे कार्य कौतुकास्पद - डॉ.एम.के इनामदार
टेंभुर्णी येथे सर्वरोग निदान शिबिरात 250 जणांची तपासणी
टेंभुर्णी/ प्रतिनिधी-- aj24Taas News Maharashtra
***************************************
रावसाहेब नाना मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या रावसाहेब नाना देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त टेंभुर्णी येथे सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 250 रुग्णांची तपासणी करण्यात आली. याशिवाराचे उद्घाटन अकलूज येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ एम.के.इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टेंभुर्णी गावचे सरपंच प्रमोद कुटे हे होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.एम.के.इनामदार आपल्या मनोगतातून म्हणाले की रावसाहेब नाना देशमुख यांचा वाढदिवस अशा विविध उपक्रमाने साजरा होत आहे. याचा मला आनंद आहे.तेव्हा इथून पुढील काळात अशी शिबिरे आयोजित करून वाढदिवस साजरा करावा हे एक कौतुकास्पद बाब आहे असे ते म्हणाले. कोविडच्या काळात ही नानांनी मला बराच त्रास दिला. परंतु तो त्रास चांगल्या कामासाठी दिला. लोकांचा जीव वाचवण्यासाठी त्रास दिला. परंतु असा त्रास लोकांच्या जीव वाचवण्यासाठी असेल तर मी नेहमी सोसायला तयार आहे असे ते म्हणाले.
यावेळी यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले व कार्यक्रमाची सुरुवात झाली. सरपंच प्रमोद कुटे असे म्हणाले की माझे सहकारी मित्र रावसाहेब नाना देशमुख यांचा वाढदिवस आजच्या अनपेक्षित वेगवेगळ्या उपक्रमाने साजरा होतो. याचा मला खूप अभिमान वाटतो. रावसाहेब नाना मित्रपरिवाराने अनावश्यक खर्चाला फाटा देऊन शैक्षणिक सामाजिक व समाज प्रबोधन पर आरोग्य विषयक कार्यक्रम चार दिवसापासून राबवून आगळ्या वेगळ्या प्रकारे वाढदिवस साजरा केला. याबद्दल रावसाहेब नाना मित्र परिवाराचे त्यांनी खूप कौतुक केले.
या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. राहुल पाटील, डॉ. लालासाहेब शेंडगे, डॉ अमोल माने, डॉ बोरकर, डॉ दादासाहेब माने, डॉ मामासाहेब पाडुळे, डॉ सुहास अनंतकवळस, डॉ संजय दोशी, डॉ धनाजी खताळ, डॉ विनायक गंभीरे, डॉ अमोल भोसले, डॉ मुकेश मस्तूद, डॉ रमेश हांडे, डॉ ज्योतिराम गव्हाणे, डॉ पल्लवी पवार, डॉ प्रतिभा वाघमोडे, डॉ दिपाली शेटे, डॉ शिवांजली मोहोळकर, नितीन हिलाले, मंदाकिनी गायकवाड, अर्चना कोळी, अनिल गरड, आशा पुरंदरे, के एम खोकले, सर्व आशाताई व आरोग्य कर्मचारी वर्ग यांनी तपासणीसाठी विशेष सहकार्य केले.
यावेळी मार्केट कमिटीचे संचालक राजाभाऊ थोरात, गोरख देशमुख, पत्रकार सतीश काळे, नवनाथ नांगरे, हरिश्चंद्र गाडेकर, ग्रामपंचायत सदस्य गणेश केचे, डॉ.सोमनाथ साळुंखे, शैलेश ओहोळ, विठ्ठल कोळपे, अशोक खटके, संतोष कोडलिंगे, बाळासाहेब देशमुख, सुरेश कुटे, हनुमंत देशमुख, दिलीप केचे, विकास करळे, नागेश माळी, वैभव महाडिक, कल्याण पाटील, स्वराज्य ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, लखन माने, अँड मंगेश देशमुख, नाना भोसले, मीटू देशमुख, प्रताप देशमुख, विजय देशमुख, अनिल देशमुख, रणजीत आटकळे, आप्पा हवलदार, बिटू केचे, जयवंत देशमुख, अमित देशमुख, लखन हवालदार, प्रथमेश खंदारे, दादा देवकर, प्रवीण चव्हाण, रत्नदीप आटकळे, आकाश सुतार, उमेश कळपे, सोमनाथ खरसाडे, अजित बिसुळके, पप्पू देशमुख, बाळासाहेब बारवे, गौरव देशमुख, हर्षल कासवेद याचबरोबर असंख्य नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रस्तावना गणेश केचे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाभाऊ पाटील यांनी केले. आभार गोरख बाप्पा देशमुख यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा