घरफोडी करणारी अट्टल महीला, श्रीगोंदा पोलीसांचे जाळ्यात
श्रीगोंदा-नितीन रोही,
सविस्तर असे की
दि. 30/03/2022 रोजी फिर्यादी अॅड. सुरेंद्र सोनाजी काळोखे रा. पंतनगर, श्रीगोंदा यांनी फिर्याद दिली की, पंतनगर येथिल राहते घराचे दरवाजाची कडी कोंडा तोडुन घरात प्रवेश करून फिर्यादीचे सोन्याचे दागिने व चांदीचे पेंजन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहे. त्याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु. रजि नं. 218/2022 भा.द.वि.क 454,457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास चालू असताना रामराव ढिकले पोलीस निरीक्षक श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांना खात्रीलायक बातमी मिळाली की सदरचा गुन्हा राणी महादेव भोसले रा. वडाळी रोड, गजानन नगर, श्रीगोंदा ता. श्रीगोंदा हीने केला आहे. त्यावरुन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना सदर महीला आरोपीस ताब्यात घेण्यास सांगितले सदर महीला हीस सी.सी.टी.व्ही. फुटेज व गुप्त बातमी मिळाल्यावरून दि. 22/06/2022 रोजी श्रीगोंदा येथुन ताब्यात घेतले. महीला आरोपीकडे वरील गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. आरोपीकडे कसून चौकशी केली असता वरील घरफोडी केल्याची कबुली दिली महीला आरोपीकडुन गुन्ह्यात चोरीस केलेला मुद्देमाल 1,00,000/-रु. ( एक लाख रुपये ) कि.चा त्यात सोन्याचे दागीने गंठण 15 ग्रॅम वजनाचे, चांदीचे दागीने 75 ग्रॅम वजनाचे व 25,000/- रु. किंची. गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची अॅक्टीवा गाडी तिचा आर.टी.ओ.नं. एम. एच. 16 वाय 7275 असा हस्तगत करण्यात आले आहे.
1) आरोपी राणी महादेव भोसले वय 35 वर्षे रा. देवकर बिल्डिंग समोर, राजीव गांधीनगर गल्ली नं. 05 पिंपळे गुरव पुणे ह.रा. वडाळी रोड, गजानन नगर, श्रीगोंदा ता. श्रीगोंदा याचेवर पूर्वी दाखल असणारे गुन्हे
1) सांगवी पोलीस स्टेशन पुणे शहर गु. रजि. नं. 17/2022 भा.द.वि.क.457,380 2) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु. रजि. नं. 218/2022 भा.द.वि.क. 454,457,380
सदर महीला आरोपी ही सराईत गुन्हेगार असुन सध्या पोलीस कस्टडी मध्ये असुन तिचेकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर महीला आरोपींकडुन 1,00,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून श्रीगोंदा पोलीस स्टेशन घरफोडीचा 01 गुन्हा उघडकीस आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील साहेब,मा. अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव साहेब यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री रामराव ढिकले पोसई समीर अभंग, सफो अंकुश ढवळे, पोना गोकुळ इंगवले, पोकॉ प्रकाश मांडगे, पोकों किरण बोराडे, पोकों दादासाहेब टाके, पोकों अमोल कोतकर यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा