नळदुर्ग व परिसरात कारवणी सण उत्साहात साजरा
प्रतिनिधी:- अजित चव्हाण
नळदुर्ग:- शेतकरी बांधवांचा मित्र म्हणून संबोधल्या जाणारा बैलांचा कारवणी सण नळदुर्ग शहर व परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषी निगडीत सर्व अवजारेचा वेळोवेळी विधिवत पूजन संपन्न होत असते. शेतीशी निगडित असलेल्या बैलांसाठी कारवणी सण अतिशय उत्साहात साजरा करण्यात येतो. गेल्या अनेक वर्षांपासून हा सण साजरा करण्याची परंपरा कायम चालू राहिली आहे. महाराष्ट्र राज्यात पोळा सण साजरा करण्यात येतो तर त्याचबरोबर कर्नाटक राज्याशेजारी वसलेल्या महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागात कारवणी सणही अतिशय उत्साहात वातावरणात साजरा केला जातो. या दिवशी बैलांना शेती कामासाठी सुट्टी दिली जाते. गोंडा, घागर मळा, शिंगांना रिबीन बांधून वाजत गाजत जल्लोषात गावातून मिरवणूक काढली जाते. पुरण पोळी भाताचा निवेद देण्यात येतो. शेतीशी निगडीत प्राण्यांसाठीचा महत्त्वाचा सण म्हणून अतिशय उत्साहात साजरा केला जातो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा