Breaking

गुरुवार, १६ जून, २०२२

गरिबांच्या जीवनात नवीन प्रकाश आणतेय अधिकारी फाउंडेशन - डॉ अशोक बनसोडे


गरिबांच्या जीवनात नवीन प्रकाश आणतेय अधिकारी फाउंडेशन - डॉ अशोक बनसोडे 


प्रतिनिधी इंदापूर
 शशिकांत सोनटक्के

पुण्यातील नामांकित डॉ अशोक बनसोडे (MBBS,MD, Intensivist & chest Disease Specialist) यांनी काल अधिकारी फाउंडेशनच्या हडपसर येथील ऑफिसला  भेट देऊन फाउंडेशनच्या कामाची माहिती घेतली त्यावेळी डॉ अशोक सरांनी फाउंडेशनच्या कार्याचं तोंड भरून कौतुक केलं आजच्या या युगामध्ये गरीब हुशार मुलांना मोफत सर्व सोयीने अधिकारी घडवण्याचा जो विडा अधिकारी फाउंडेशनने उचलला आहे तो नक्कीच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलासाठी प्रेरणादायी आहे. 

पुढे बोलताना डॉ नी मुलांना सक्सेचचा कानमंत्र दिला आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन कसा आहे यावर आयुष्याची दिशा ठरते बहुतेक लोक हे नकारात्मक दृष्टीकोन बाळगून कुढत जगत राहतात. माझ्याकडे काय आहे यापेक्षा काय नाही हे सांगण्यावर जास्त भर असतो अश्या नकारात्मक दृष्टीकोनामुळेच त्यांना अपयशाचा सामना करावा लागतो अपयश हे कोणाला पण येऊ शकते परंतु त्याची कारणीमिमंसा  होऊन सकारात्मकतेने त्रुटी निराकरण करून समोरच्या अडचणींना निर्धाराने सामोरे गेले पाहिजे नकारात्मक लोकं स्वतःच्या अपयशाची कारणे शोधण्यापेक्षा बहाणे शोधतात आणि त्या चुका मधून बोध घेण्याऐवजी त्याच चुकांची पुनरावृत्ती करतात असे प्रतिपादन डॉ अशोक बनसोडे यांनी केले 

जगात कोणतीही व्यक्ती अशी नसेल ज्या व्यक्तीकडे सर्वकाही आहे आणि त्याला कोणत्याही समस्या,मर्यादा नाहीत. मर्यादा शरीराला असाव्यात मात्र मनाला असू नये असे प्रतिपादन गजनान खेरकर ( संचालक साई निधी अर्बन बँक) यांनी केले. यावेळी बोलताना गजानन सरांनी अधिकारी फाउंडेशन साठी आम्ही पण काही तरी देन लागतो असे प्रतिपादन केले.
अधिकारी फाउंडेशनच्या अधिकारी घडवण्याच्या मोहिमेला समाजातील दानशूर व्यक्तींनी ही आपला हातभार लावावा असे अहवान अधिकारी फाउंडेशनचे अध्यक्ष उस्मान शेख यांनी केले यावेळी उपस्थित फाउंडेशनचे विश्वस्त प्राध्यापक अमोल मराडे(JSPM MBA कॅम्पस पुणे) यांनी सर्वाचे आभार मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा