*रामनाथ विद्यालयांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न.*
*लातूर / ज्ञानेश्वर सूर्यवंशी*
श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलमला तालुका औसा. जि. लातूर येथील सन 2021 -22 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ दिनांक 25 जून 2022 रोजी विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री विश्वनाथ बिराजदार, चेअरमन विविध कार्यकारी सहकारी सोसायटी आलमला हे उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माननीय डॉक्टर बसवराज पटने साहेब, सचिव मुक्तेश्वर शिक्षण संस्था औसा. व माननीय श्री राम कापसे, शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती औसा हे उपस्थित होते.
याप्रसंगी संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता दहावी, बारावी परीक्षेमध्ये विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना, व त्यांच्या पालकांना मानचिन्ह, शैक्षणिक ग्रंथ, व पुष्पहार देऊन गौरविण्यातआले. याप्रसंगी कु.सृष्टी कुंभार या विद्यार्थिनीने आपले मनोगत मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री प्रभाकर कापसे यांनी केले. याप्रसंगी वृत्तपत्र संपादक श्री महादेव कुंभार यांनीही विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या, श्री प्रशांत धाराशिवे प्राचार्य विश्वेश्वरय्या पॉलीटेक्निक यांनीही विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील अनुभव सांगून पुढील शिक्षणासाठी प्रेरणा दिली.तसेच या कार्यक्रमात प्रमुख अतिथी श्री राम कापसे व डॉ. बसवराज पटणे यांनी विद्यार्थ्यांना यापुढील शिक्षणातही उत्तुंग यश मिळवावे व विविध स्पर्धात्मक परीक्षेत सहभाग वाढवून त्यात नेत्रदीपक कामगिरी करावी, अशा शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी सरपंच श्री कैलास निलंगेकर, श्री अहमद तांबोळी व्हाईस चेअरमन, श्री सुरेन्द्र पाटील पो. पाटील आलमला, केंद्रीय शाळेतील मु.अ. श्री वामन राठोड
संस्थेचे विश्वस्त सोपान काका आलमलेकर, ऍड. उमेश पाटील, श्री प्रभाकर कापसे, मन्मथप्पा धाराशिवे, श्री शिवाजी अंबुलगे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता पाटील, पर्यवेक्षक श्री पी. सी. पाटील, विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पाटील पी.सी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. भारत चव्हाण यांनी केले...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा