Breaking

रविवार, २६ जून, २०२२

बळीराजाच राज्य येऊ देः ःःः".रयत क्रांती संघटनेचे राज्यात ठिकठीकाणी देवाला साकडे .... प्राध्यापक सुहास पाटील


".... बळीराजाच राज्य येऊ देः ःःः".रयत क्रांती संघटनेचे राज्यात ठिकठीकाणी देवाला साकडे ...प्राध्यापक सुहास पाटील


बेंबळे।प्रतीनीधी।           

आज आमदार सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या वतीने "इडा पिडा टळु दे बळीराजाचं राज्य येऊ दे... महाविकास आघाडीचं लुटारुंचं राज्य जाऊ दे".... याकरिता राज्यभर आज देवाला साकडं घालण्यात येत असल्याची माहिती रयत क्रांती संघटनेचे जिल्हा समन्वयक प्रा सुहास पाटील यांनी दिली आहे.

सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण हे शेतकऱ्यांवर आणि कष्टकरी जनतेवर आजवर अन्याय करणाऱ्या महाविकास आघाडीला चोख उत्तर आहे.

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं कधीच पूर्ण केली गेली नाहीत किंवा शेतकरी हितासाठी कोणतीही ठोस पावलं उचलली गेली नाहीत. आणि फक्त जनतेची लुटमार सध्याच्या आघाडी सरकारने केली. उपेक्षित वर्गातील लोकांसाठी रयत क्रांती संघटना नेहमीच आपला बुलंद आवाज सरकार समोर मांडत आलेली आहे. 

म्हणूनच या सरकारला कंटाळून महाराष्ट्रातील शेतकरी आणि कष्टकरी वर्ग लुटारूंचं हे सरकार जाऊन कधी एकदा बळीराजाचं राज्य येईल आणि त्या राज्यात शेतकरी कष्टकरी सुखी असतील अशी इच्छा व्यक्त करत आहेत. 

याच पार्श्वभूमीवर संपूर्ण  महाराष्ट्रात शेतकरी हितासाठी लढणाऱ्या रयत क्रांती संघटना ह्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून चौकाचौकात तर ह्या सरकारच्या भकासकामांना कंटाळलेल्या शेतकऱ्यांकडून  बांधा बांधावर "इडा पिडा टळु दे बळीचं राज्य येऊ दे" महाविकास आघाडी सरकारचं लुटारूंचं राज्य जाऊ दे याकरता बळीराजाला साकडं घालण्यात आलं.रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते प्रा सुहास पाटील यांनी माढा तालुका रयत क्रांती संघटनेच्यावतीने रांझणी येथे ओकांरनाथ मंदिरात अभिषेक करून लवकरात लवकर राज्यात भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांचे सरकार सत्तेत येवो,व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असा मनोदय व्यक्त केला.यावेळी भारतीय जनता पक्षाचे ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष निवृत्ती तांबवे,रयत क्रांतीचे जिल्हा समन्वयक विठ्ठल मस्के,विश्वकर्मा लोहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दादासाहेब कळसाईत,भाऊ काळे,टाकळी सोसायटीचे व्हाईस चेअरमन तथा ग्रां पं सदस्स अजित घाडगे,भाजपचे तालुका संघटक प्रशांत जाधव,रयत क्रांतीचे सोशल मिडीया अध्यक्ष अमर पवार,अमोल जाधव,माजी सरपंच  आप्पा यादव,अक्षय यादव,सोमनाथ जवळगे,शिवाजी चव्हाण,पिंटु लेंगरे आदीजन ऊपस्थित होते..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा