Breaking

बुधवार, ८ जून, २०२२

तुळजापूर येथील न्यायालयाच्या परिसरात वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा*



**तुळजापूर येथील न्यायालयाच्या परिसरात वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा*


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.


वृक्षारोपन करूया, पर्यावरणाचे रक्षण करून मानवी जीवन सुरक्षित करूया
दरवर्षी ५ जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो, पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा हेतू आहे. दिवाणी न्यायालय तुळजापूर येथील परिसरामध्ये दि. ०७ जून २०२२ रोजी तालुका विधी सेवा समिती तुळजापूर, विधीज्ञ मंडळ, तुळजापूर आणि वनविभाग कार्यालय , तुळजापूर यांचे संयुक्त विद्यमाने मा. श्री. एम. एम. निकम, दिवाणी न्यायाधीश क. स्तर, तुळजापूर यांचे हस्ते वृक्षारोपन करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. 
यावेळी मा श्रीमती पी. एस. जी. चालकर मॅडम, सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, तुळजापूर, विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष श्री. डि जे घोडके, सर्व विधीज्ञ, तुळजापूर, वनपाल श्री. एस बी घोरपडे , वनरक्षक श्री. व्ही एस पाटील, एस एस पवार, आर बी चव्हाण, ए बी खंदारे, एस बी तांदळे, के यु साबदे तसेच न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी व पक्षकार मोठया संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा