Breaking

रविवार, ५ जून, २०२२

बेंबळे ग्रा.पं.च्या पोट निवडणुकीसाठी चुरशीने ८३ टक्के मतदान...



बेंबळे ग्रा.पं.च्या पोट निवडणुकीसाठी चुरशीने ८३ टक्के मतदान...


सज्जन शिंदे 
बेंबळे प्रतिनिधी: बेंबळे ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ५ मधील एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणूकीसाठी  चुरशीने ८३ टक्के मतदान झाले. एका महिला सर्वसाधारण जागेसाठी तीन उमेवारांचे भवितव्य मत पेटीत बंद झाले असून मतमोजनी दि. ६ जून रोजी माढा येथे होणार आहे. या तिरंगी लढतीसाठी प्रभाग क्रमांक ५ मधील ११०५ मतदारांपैकी  ९२४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ४८३ पुरूषांनी ४४१ महिला मतदात्यांनी मतदान केले.

विमलेश्वर-सिध्देश्वर आघाडीकडून रेष्मा सागर  हुंबे, शिवशंभो आघाडीकडून राजश्री समाधान भोसले तर नविन तिसऱ्या बनेश्वर ग्राम विकास आघाडीकडून सोनाली गौतम काळे या तीन महिला उमेदवार निवडणूक रींगणात आहेत.
 बेंबळे ग्रामपंचायत निवडणूकीसाठी तिरंगी लढत असल्यामुळे निवडणूक रंगतदार होणार आहे. आ. बबनराव शिंदे यांच्या  मार्गदर्शनाखाली प्रथमच एकत्र आलेल्या विमलेश्वर-सिध्देश्वर आघाडीसाठी ही निवडणूक आगामी निवडणूकांसाठी रंगीत तालीम असणार आहे. तर सत्ताधारी शिवशंभो आघाडीसाठी वर्चस्वाची लढाई असणार आहे. तसेच तिसऱ्या बनेश्वर ग्राम विकास आघाडीने सुध्दा चांगलीच मोट बांधूली असून हम भी किसीसे कम नही हे दाखवून द्यायचे असल्याने तीनही आघाड्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळे उमेवारांसह आघाडीचे कार्यकर्ते व नागरिकांत निकालाची उत्सुकता निर्माण झाली आहे.

निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पथक तैनात होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा