Breaking

शुक्रवार, २४ जून, २०२२

शेवरे येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावरती कारवाई



शेवरे येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावरती कारवाई

टेंभुर्णी प्रतिनिधी:-
सोलापूर पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर असणाऱ्या माढा तालुक्यातील शेवरे या गावी टेंभुर्णी पोलिसांनी अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टर वरती कारवाई केली आहे.
याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्याकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की शेवरे गावाच्या हद्दी मध्ये भीमा नदीच्या पात्रामध्ये असणाऱ्या बंधारा जवळ एम.एच.१३ ए.जे -०९५३ या निळ्या रंगाच्या ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉली मधून एक ब्रास माती मिश्रित वाळूची अवैधरीत्या वाहतूक करण्यात येत होती त्या वेळी त्या ठिकाणी पोलीस पोहोचल्यानंतर ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर व ट्रॉली जागेला सोडून पळ काढला. सदर अज्ञात ट्रॅक्‍टर चालकाविरुद्ध पोलीस शिपाई बाळराजे रामचंद्र घाडगे यांच्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये पर्यावरण अधिनियम व इतर कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर ठिकाणी ट्रॅक्टर सोबत वाळू उपसा करण्यासाठी जेसीबी सारख्या वाहनांचा आहे उपयोग करण्यात येतो तसेच या अवैद्य वाळू उपशाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची चर्चा शेवरे व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात करीत आहेत
सदर घटनेचा अधिकचा तपास टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक लांडगे हे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा