Breaking

मंगळवार, २१ जून, २०२२

जालन्यातील पत्नीचे पोटगी मागणीचा अर्ज मे. फॅमिली कोर्टाने नामंजूर केला - एडवोकेट श्रीनिवास कटकुर*



*जालन्यातील पत्नीचे पोटगी मागणीचा अर्ज मे. फॅमिली कोर्टाने नामंजूर केला - एडवोकेट श्रीनिवास कटकुर*

*सोलापूर* पती  श्री. अनिकेत स्वामी वय 36 वर्ष राहणार अवंती नगर सोलापूर यांच्याविरुद्ध पत्नी सौ सुनंदा राहणार साईनगर जालना तिने पतीविरुद्ध जालना येथील फॅमिली कोर्टात मागणी केलेला पोटगीचा अर्ज जालना येथील फॅमिली कोर्टाने फेटाळला.

 *यात सविस्तर हकीकत अशी की* 

सोलापूरचे पती अनिकेत यांचा जालना येथील मुलगी सौ सुनंदा यांच्याशी सन 2007 मध्ये विवाह झाला होता.  लग्नानंतर पत्नी सौ सुनंदा ही नेहमी घरात  किरकोळ कारणावरून भांडण काढून वाद करीत असे. व ती अत्यंत तापट स्वभावाची होती व अशातच भांडण करुन तीन वर्षांपूर्वी जालना येथे माहेरी  निघून गेली व तद्नंतर सहा महिन्यापूर्वी जालना येथील मेहरबान .फॅमिली कोर्टात सोलापूरचे पती अनिकेत स्वामी यांच्या विरुध्द  दरमहा 15 हजार रुपये पोटगी मिळण्याचा अर्ज फौजदारी प्रकिया संहिता कलम 125 प्रमाणे कोर्टात पोटगीचा अर्ज दाखल केला होता.  याकामी पती अनिकेत स्वामी राहणार- सोलापूर यांच्या वतीने सोलापुरातील प्रसिद्ध विधिज्ञ अँड. श्रीनिवास कटकुर यांच्यातर्फे जालना येथील फॅमिली कोर्टात पती अनिकेत हजर राहुन म्हणणे दिले  व  सुनावणी झाली या कामी पती अनिकेत स्वामी सोलापूर यांच्या वतीने युक्तिवाद मध्ये अँड. श्रीनीवास कटकुर  यांनी बाजु मांडली की , पत्नी सुनंदा ही तीन वर्षापूर्वी स्व इच्छेने माहेरी निघून गेली व नांदण्यास नकार देत आहे  व स्वतः जालना येथे फायनान्स कंपनीचा  एजन्सीचा व्यवसाय चालू केली व स्वत:  उच्चविद्याविभूषित असून जालना येथे व्यवसायातून खूप मोठे उत्पन्न मिळते , त्यामुळे पतीपासून पोटगी मिळविण्यास पात्र नाही व ती स्वतःचा  सांभाळ करण्यास सक्षम आहे ,  असे युक्तिवादामध्ये पतीकडून अँड. श्रीनीवास कटकुर  यांनी बाजू मांडली व तसेच माननीय. उच्च न्यायालय व मा. सर्वोच्च न्यायालयाचे न्याय निवाडे दाखल करण्यात आले.  व  फॅमिली कोर्ट जालना यांनी सर्व कागदपत्रे व पुरावे पाहून आणि वकिलांचा युक्तिवाद  ऐकून जालना येथील पत्नी सौ. सुनंदा यांचा पती विरुद्ध पोटगीचा अर्ज  मेहरबान. जालना फँमिली कोर्टाने फेटाळला. व  
*याकामी सोलापूरचे पती अनिकेत  स्वामी यांच्या वतीने अँड.  श्रीनिवास कटकुर  सोलापूर व  अँड.  किरण कटकुर , अँड. आनंद सागर सोलापूर व अँड. विलास राठोड  जालना यांनी काम पहिले आहे व पत्नी तर्फे अँड. नाईक जालना  यांनी काम पाहिले आहे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा