आढेगांव सोसायटीच्या चेअरमनपदी अश्विन पाटील व व्हाईस चेअरमनपदी पोपट पडवळकर यांची बिनविरोध निवड
भिमानगर प्रतिनिधी
प्रदीपराव पाटील
माढा तालुक्यातील आढेगांव येथील रणजितसिंह मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अश्विन उर्फ सोनू पाटील व व्हाईस चेअरमनपदी पोपट पडवळकर यांची सर्वानुमते मंगळवार दिनांक २१ जून२०२२ रोजी आढेगाव ग्रामपंचायत कार्यालयात बिनविरोध निवड करण्यात आली.
रणजितसिंह मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची स्थापनेपासून संचालक मंडळ, चेअरमन व व्हा.चेअरमन पदाच्या बिनविरोध निवडीची परंपरा असून आजतागायत ती सुरू आहे.यावेळी चेअरमन,व्हाईस चेअरमन व संचालकांचा उपसभापती धनाजी जवळगे आढेगाव ग्रामपंचायत सरपंच चित्रा वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी उपसभापती धनाजी जवळगे, सरपंच चित्रा वाघ, उपसरपंच प्रतिनिधी बाबूराव चोपडे, चेअरमन सौदागर चव्हाण, माजी उपसरपंच शरद पाटील, बाळासाहेब वाघ,रघुनाथ वाघ,विठ्ठल चव्हाण,समाधान पाटील,सचिन निकम,कैलास कुंभार,प्रीतम शेळके,अरुण गोरे,अंबादास साळुंके, अमोल पाटील, बाळासाहेब चव्हाण, दादा चव्हाण, गणेश शिंदे पाटील,सुरज निकम, तुकाराम चव्हाण, गणेश शिंदे पाटील, माधव वाघ, गोविंद शिंदे पाटील, सोमनाथ व्यवहारे, बापूराव लोकरे,नवनाथ पडळकर, भारत भुजबळ, सुहास पाटील,पप्पू शिंदे, समीर वाघ, पोपट बोडरे,शंतनू पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुंडासे व रूपनवर भाऊसाहेब यांनी काम पाहिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा