Breaking

शुक्रवार, १७ जून, २०२२

बारामती अँग्रो चा दुसरा हफ्ता प्रतिटन २५० रु ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात जमा.



बारामती अँग्रो चा दुसरा हफ्ता प्रतिटन २५० रु ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात जमा.


  २५५० रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळाले. आणखी तिसरा हप्ता दिवाळीत जमा होणार - सुभाष गुळवे


AJ24Taas News Maharashtra /साठी कन्हेरगांव प्रतिनिधी - धनंजय मोरे 


 बारामती ॲग्रो ने सरलेल्या ऊस गाळप हंगामातील उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन २५० रुपये ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात जमा केला आहे , अशी माहिती बारामती ॲग्रो चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी दिली.    


         बारामती ॲग्रो ने सरलेल्या गळीत हंगामात १७ लाख 30 हजार अश्या उच्चांकी उसाचे गाळप केले आहे. कारखान्याची रिकव्हरी सरासरी ११.९० आहे. बारामती ॲग्रो च्या वतीने ऊस उत्पादकांना पहिला हप्ता प्रतिटन २३०० रुपये यापूर्वीच ऊस उत्पादकांना दिलेला असून रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात पैशाची गरज असताना दुसरा हप्ता प्रतिटन २५० रुपये प्रमाणे ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात कारखान्याचे संस्थापक चेअरमन राजेंद्र पवार व आ.रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जमा केला आहे.  बारामती ॲग्रो साखर कारखान्यांचे आतापर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २५५० एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे.
       कारखान्याच्या वतीने गळीत हंगामाचा उर्वरित तिसरा हप्ता दिवाळी सणाच्या तोंडावर देण्यात येणार असल्याचेही उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी सांगितले. बारामती अग्रो ने रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना दुसरा हप्ता दिल्याने शेतकरी -यातून आनंद व्यक्त केला जात आहे. आदिनाथ सह,साखर कारखाना बारामती अँग्रो ने भाडेकराराने घेतलेला असुन आदिनाथ चा गाळप हंगाम कधी सुरू करणार असे विचारले असता येणा-या गळीत हंगामात आदिनाथ चा भोंगा वाजेल व बारामती अँग्रो आदिनाथ चे गाळप येत्या हंगामात घेतला जाणार असल्याचेही सुभाष गुळवे यांनी सांगितले.

टिप . 
बातमीत सुभाष गुळवे यांचा फोटो घ्यावा ही विनंती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा