मिटकलवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने
यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव..
फोटो --सज्जन शिंदे
बेंबळे वार्ताहर:- माढा तालुक्यातील मिटकलवाडी येथे दहावी व बारावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा मिटकलवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने गुणगौरव करण्यात आला.
दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केलेले विद्यार्थी आदेश मिटकल, सुरज मिटकल, जयकुमार मिटकल, सुषमा मिस्कीन, प्रतिक्षा श्रीखंडे, धनश्री श्रीखंडे, अमृता श्रीखंडे विद्यार्थ्यांना यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, व त्यांचे भविष्य उज्वल व्हावे यासाठी ग्रामपंचायत मिटकलवाडीच्या विद्यमाने एस् एस् सी परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी उपसरपंच रविंद्र श्रीखंडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थितीत राजाराम मिटकल, चेअरमन संजय मिटकल, सहदेव मिस्कीन, नागनाथ लोकरे, शिवाजी मिटकल, किसन ठेंगल तसेच जि प शाळा मिटकलवाडी चे मुख्याध्यापक कोरे सर, शिक्षक पोफळघट सर, क्षिरसागर सर, पिसाळ मॅडम, काकडे मॅडम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा