Breaking

गुरुवार, ९ जून, २०२२

टाकळी येथील न्यू इंग्लिश स्कूलची कला शाखेमध्ये कु. ज्योती सल्ले प्रथम.



टाकळी येथील न्यू इंग्लिश स्कूलची कला शाखेमध्ये कु. ज्योती सल्ले प्रथम.


भिमानगर/ प्रतिनिधी     
            माढा तालुक्यातील टाकळी टे येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली असून या वर्षीच्या इयत्ता बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.कला शाखेत प्रथम चारही क्रमांक मुलीने पटकावले असून विज्ञान शाखेमध्ये पहिल्या चार क्रमांक मध्ये तीन मुलींनी बाजी मारली आहे.तर दोन मुलांनी अनुक्रमे प्रथम व चतुर्थ क्रमांक पटकावला आहे. कला शाखेमध्ये कुमारी ज्योति बापू सल्ले हीने 83 टक्के गुण घेऊन प्रथम आली आहे. तसेच माया अर्जुन चव्हाण 82.83 % गुण मिळवून द्वितीय, कोमल बाळासो माने 79.83% गुण घेऊन त्रितीय आणि आशाबाई राजेंद्र कोकाटे 79.50 % गुण घेऊन चतुर्थ क्रमांक पटकविला आहे.
              याच विद्यालयांमध्ये विज्ञान शाखेत आदित्य रामचंद्र कचरे 90 टक्के गुण घेऊन प्रथम, प्राजक्ता दिनकर खुणे 79.83% गुण घेऊन द्वितीय साक्षी बाळासाहेब राजमाने 79.33 % गुण घेऊन तृतीय तर सानिका तुकाराम भोसले व अभिजीत ज्ञानेश्वर जाधव हे विद्यार्थी 89 टक्के गुण घेऊन चतुर्थ आली आहे.
           या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक आमदार बबनराव शिंदे, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह शिंदे, संस्थेचे चेअरमन विक्रमसिंह शिंदे, प्रशालेचे प्राचार्य महादेव सुरवसे, प्राध्यापक वर्ग, टाकळी व टाकळी परिसरातील लोकांनी व पालकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा