Breaking

सोमवार, १३ जून, २०२२

भादलवाडी वि का सोसायटी च्या निवडणूकीत आजी-माजी सरपंचांच्या पॅनलमध्ये तुल्यबळ लढत*



भादलवाडी वि का सोसायटी च्या निवडणूकीत आजी-माजी सरपंचांच्या पॅनलमध्ये तुल्यबळ लढत




  *भिगवन /प्रतिनिधी     तालुक्यातील    भादलवाडी येथील सोसायटी पंचवार्षिक निवडणूकीच्या प्रचाराचा नारळ फुटला असून , प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे.  एक जागा बिनविरोध झाली आहे.12 जागांसाठी 24 उमेदवार रिंगणात आहेत श्री भैरवनाथ विकास पॅनल विरुद्ध श्री भैरवनाथ  सहकार विकास पॅनल या दोन गटांमध्ये प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे.

         श्री भैरवनाथ विकास पॅनल चे प्रमुख श्री शिवाजी कन्हेरकर[ सरपंच ग्रामपंचायत भादलवाडी ] तर भैरवनाथ सहकार विकास पॅनल चे प्रमुख श्री प्रविण पाटील [ मा सरपंच ग्रामपंचायत भादलवाडी] असून सोसायटी निवडणूकी त दोन गटांमध्ये 24 उमेदवार आपले नशीब अजमावत असून त्याचे भवितव्य 287 सभासदांच्या हातांमध्ये आहे. सभासद हे एका गटाच्या गळ्यात विजयश्री माळ टाकणार की  विभागून मतदार करणार याकडे  सर्वांचे लक्ष लागले आहे. सभासदांच्या गाठीभेटी घेण्याचा वेग वाढला आहे.सत्ता परिवर्तन होणार कि सत्ताधाऱ्यांकडे सत्ता राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा