जॉब फॉर स्किल यांच्या मार्फत खडकी शिक्षण संस्थेत रोजगार महामेळावा
प्रतिनिधी इंदापूर
शशिकांत सोनटक्के
जॉब फॉर स्किल व अधिकारी फाउंडेशन यांच्या मार्फत खडकी येथील टीकाराम जगन्नाथ कला वाणिज्य आणि विज्ञान महाविदयालयामध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यात 422 तरुणांच्या मुलाखती झाल्या त्यापेकी 116 जणांची निवड करण्यात आली आणि त्याच ठिकाणी निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीचे नियुक्तीपत्र दिपक पवार,श्वेता बेरड, अक्षय परदेशी यांच्या हस्ते देण्यात आले देण्यात आले
या रोजगार मेळाव्यातमध्ये विविध विभागात काम करणाऱ्या तरुणांना नोकरीची संधी देण्यात आली यावेळी बोलताना जॉब फॉर स्किलचे डायरेक्टर दिपक पवार यांनी निवड न झालेल्या तरुणांना स्कील विकास करून पुन्हा एकदा संधी देण्यात येईल असे सांगितले तसेच इथून पुढच्या काळातही महाविद्यालयामध्ये असे रोजगार मेळावे होत राहतील असे आश्वासन दिले यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असणारे खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी जॉब फॉर स्किल चे कौतुक केले व असे रोजगार मेळावे पुन्हा पुन्हा आयोजीत करावे असे दिपक पवार यांना सांगितले तसेच कार्यक्रमावेळी संस्थेचे सचिव आनंद छाजेड, अधिकारी फाउंडेशन अध्यक्ष उस्मान शेख, वीणा मनचंदा, रमेश अवस्थी, मोहन सर, ऍड सूर्यवंशी, मा. मुरकुटे सर , कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक संजय चाकने आधी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ महादेव रोकडे तर सूत्रसंचालन डॉ शीतल रणधीर आणि आभार मेहनाज कोसर यांनी केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा