Breaking

गुरुवार, ३० जून, २०२२

दहावीच्या परिक्षेत भुरकवडीच्या सुकन्यांचे सुयश


दहावीच्या परिक्षेत भुरकवडीच्या सुकन्यांचे सुयश



वडूज प्रतिनिधी  /शरद कदम


            कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षात विविध स्तरावर झालेल्या बदलांना मोठया धैर्याने सामोरे जात आणि कोणतेही दडपण न घेता मार्च २०२२ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने एसएससी बोर्डाने मागील आठवडयात निकाल जाहीर केला. या परिक्षेमध्ये भुरकवडी ता खटाव येथील सुकन्यांनी सुयश प्राप्त केले.
          या एस एस सी परिक्षेत साधना इंग्लीश मिडीयम स्कूल सातारा येथील विद्यार्थीनी कु. वेदांतिका अरविंद कदम हिने ९५ टक्के गुण, मुंबई चेंबूर येथील सरस्वती विद्यालयाची विद्यार्थीनी कु.अपूर्वा संतोष कदम हिने ९४ टक्के गुण तर छत्रपती शिवाजी हायस्कूल वडूजच्या विद्यार्थीनी कु अनुजा शरद कदम हिने ९१ टक्के गुण, कु. श्रावणी ताराचंद आंधळकर हिने ८५ टक्के गुण, तर कु. साक्षी पांडूरंग सुर्यवशी हिने ८४ टक्के गुण प्राप्त करून यश संपादन केले. या यशाबददल सर्व विद्यार्थीनींचे, शिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन विविध स्तरातील मान्यवरांकडून होत आहे.
वडूज - कु वेदांतिका कदम, कु.अपूर्वा कदम कु.अनुजा कदम कु. श्रावणी आंधळकर कु. साक्षी सुर्यवंशी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा