चालकाचे हात पाय बांधून लुटलेला मालट्रक चोवीस तासात ताब्यात .
➡️ चोवीस तासात लावला पोलिसांनी छडा .
➡️ मोहोळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई .
मोहोळ प्रतिनिधी - लोखंडी सळ्या घेऊन जालन्या हुन सांगली कडे निघालेल्या मालट्रक चालकाला मोहोळ तालुक्यातील आष्टी शिवारात तलवार व बंदुकीचा धाक दाखवून हातपाय बांधत ठेवत मालट्रक चोरून नेणार्या एका संशयित व्यक्तीला मोहोळ पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात ताब्यात घेऊन चोरलेला माल ट्रक मुद्देमालासह जप्त केला असल्याची माहिती मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी दिली .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार . प्रविण अंबादास सरगर ( रा . नाझरा ता . सांगोला ) यांनी त्यांच्या मालकीची टाटा कंपनीची मालट्रक ( एम एच १० झेड १३५२ ) ४ मे रोजी मोहोळ तालुक्यातील मौजे आष्टी शिवारात गाडीवर ठेवलेली ताडपत्री काचेवर आल्याने ताडपत्री बाजूला घेण्यासाठी आणि लघुशंके करीता थांबविला होता . त्यावेळी इंडिका कार वेगाने येऊन गाडीजवळ थांबली व गाडीतून पाच सह जण उतरले त्यापैकी चार जणांनी ट्रक चालकाला रस्त्याच्या बाजूला असलेल्या उसाच्या शेतात उचलून नेले . ट्रक चालक आरडाओरडा करत असताना त्याच्या डोक्यास एकाने बंदुक तर एकाने तलवार लावली आरडाओरडा केला तर ठार मारू अशी धमकी देऊन हात पाय बांधून डोळ्यास काळी पट्टी बांधली आणि एक जण ट्रक घेऊन गेला व बाकीचे रस्त्यांवरून आलेल्या वाहनांचा अवाज ऐकून निघून गेले . काही वेळाने सरगर यांनी हातापायांना बांधलेली रस्सी काढून माल ट्रक रस्त्यावर आहे का नाही हे बघण्यासाठी रस्त्यावर आले असता त्यांना मालासह भरलेला ट्रक दिसला नसल्याने त्यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात सळ्याभरलेला ट्रक मालासह अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद दिली होती . गुन्हा घडल्यानंतर तात्काळ मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून दोन पोलिस पथके चोरीस गेलेल्या ट्रकच्या दिशेने पाठवून गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढून संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आणि दरोडा टाकून लुटलेले आयकाॅन कंपनीचे स्टिल . व एम एच १० झेड १३५२ क्रमांकाचा ट्रक असा मिळून १३ लाख ४० हजार रुपयाचा ऐवज परांडा तालुक्यातील येनेगाव येथून जप्त केला .
हि कारवाई पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते . अप्पर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव . उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती . यांच्या मार्गदर्शनाखाली . मोहोळ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर . सपोनि राजकुमार डुणगे . पोहेकाॅ शरद ढावरे . पोहेकाॅ सचिन माने . पोना प्रविण साठे . पोकाॅ पांडूरंग जगताप . पोकाॅ हरिदास थोरात व सायबर शाखेचे पोना युशूब पठाण यांनी पार पाडली .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा