Breaking

शनिवार, २ जुलै, २०२२

पोंधवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा अनोखा उपक्रम त्र्यंबकेश्वर येथील दिंडीतील वारकऱ्यांना विद्यार्थ्यांनी दिली विविध झाडांच्या बिया


पोंधवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा अनोखा उपक्रम त्र्यंबकेश्वर येथील दिंडीतील वारकऱ्यांना विद्यार्थ्यांनी दिली विविध झाडांच्या बिया 




करमाळा प्रतिनिधि आज जि.प.प्रा.शाळा पोंधवडी येथील इयत्ता सातवी मधील विद्यार्थ्यांनी व वर्गशिक्षिका मनीषा हरिश्चंद्र पेठकर यांनी त्र्यंबकेश्वर येथील दिंडी मधील वारकऱ्यांना आंबा, चिंच , करंज कडुलिंब,जांभूळ, गुलमोहर या झाडांच्या 1000 बियांचे वाटप करुन पंढरपूर येथे जाताना रस्त्याच्या कडेला या बिया लावण्याची विनंती विद्यार्थ्यांनी केली.या विद्यार्थ्यांच्या अनोख्या भेटीमुळे वारकरी भारावून गेले.व प्रत्येक वारकरी झाडांच्या बिया लावतील याची खात्री दिली.पर्यावरण वाचविण्यासाठी हा खूप उत्कृष्ट उपक्रम आहे तसेच लहान वयात  झाडे लावणे व झाडे वाढविण्यासाठी प्रयत्न करणे हे संस्कार शाळेत होते ही खूपच अभिमानस्पद आहे अशी प्रतिक्रिया आदरणीय महाराज रवीकांत तळेकर  यांनी व्यक्त करून उपक्रम राबविले बद्दल शाळेचे व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री साबळे सर , गायकवाड सर,चोपडे सर,     म्हेत्रे सर, इनामदार सर, वाघमारे सर,  केकान सर कांबळे मॅडम यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा