Breaking

शनिवार, २ जुलै, २०२२

यशोदिप कॅम्पुटर एज्युकेशन टेंभुर्णी व यशोदीप फाउंडेशन टेंभुर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने* टेंभुर्णीत येथे उद्या गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन


*यशोदिप कॅम्पुटर एज्युकेशन टेंभुर्णी व यशोदीप फाउंडेशन टेंभुर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने*
टेंभुर्णीत येथे उद्या गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन

टेंभुर्णी (प्रतिनिधी) गणेश चौगले

यशोदिप कॉम्प्युटर एज्युकेशन व यशोदिप फाऊंडेशन, टेंभुर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने टेंभुर्णीत रविवार, ३ जुलै रोजी सन २०२१-२२ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाला गवसणी घालणाऱ्या यशस्वितांचा तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंतांचा गुणगौरव सोहळा  व करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यशोदिप कॉम्प्युटर एज्युकेशन व यश फाऊंडेशनचे संस्थापक - अध्यक्ष गोरख खटके-पाटील यांनी दिली. 
या कार्यक्रमास आमदार बबनराव शिंदे, आमदार संजयमामा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून मैत्री इन्स्टिटय़ूट लातूरचे सचिव तथा सुप्रसिद्ध करिअर मार्गदर्शक डॉ.धनंजय गायकवाड यांची करिअर मार्गदर्शन कार्यशाळा यावेळी आयोजित करण्यात आली आहे. दहावी, बारावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यानंतर पुढे काय? हा प्रश्‍न सर्वांसमोर असतो. अशावेळी तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन लाभले तर करिअरला एक नवी दिशा मिळू शकते. निर्णय घेण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. हे मार्गदर्शन संबधित विषयातील तज्ज्ञांकडून मिळाले तर अधिक उपयुक्त ठरते. हे लक्षात घेऊन टेंभुर्णी व परिसरातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी या करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक  क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रविवार,३ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता रोटरी हॉल,टेंभुर्णी येथे होणाऱ्या या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व नागरिकांनी  उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

हेच निमंत्रण पत्रिका समजून सर्वांनी कार्यक्रमांना यावे हीच नम्र विनंती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा