दशनाम गोसावी व खिश्चन सामाजाच्या दफनभूमीस व अत्यंविधीस विनाकारण विरोध करणा - यांवर कारवाई करून पोलीस संरक्षण मिळावे
AJ 24Taas News Network
अहमदनगर महानगरपालिकेने दशनाम गोसावी समाज व ख्रिस्ती समाजास मोजे नालेगाव हद्दीतील दफनभूमी आरक्षण जागा आरक्षण क्रमांक 296 स नं 221/1 मधील एक हेक्टर 20 आर ख्रिस्ती समाजास व 40 आर दशनाम गोसावी समाजास अंत्यविधी व दफन विधी करणे करिता देण्यात आली आहे.
सदर जागेमध्ये बाभळीचे झाडे काढून टाकण्याचे काम चालू असून सदर जागा साफ करून मोजणी करण्याचे काम करावयाचे आहे. परंतु सदर जागेवर ख्रिस्ती व गोसावी समाजातील कोणत्याही व्यक्तीने सदर जागेची स्वच्छता करू नये व कोणत्याही समाजाने या ठिकाणी अंत्यविधी करू नये म्हणून स्थानिक रहिवाशी सदर जागेवर येऊन चालू असलेल्या साफसफाई चे काम बंद पाडत आहे.
त्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांवर दमदाटी करून दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे व त्या झोपड्या पाडण्याचे काम करीत आहे. तसेच त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून अंत्यविधीस व दफन विधीस विरोध करीत आहेत सदर जागा दफन भुमीसाठी आरक्षित असून, महापालिकेने ठराव करून ख्रिस्ती व गोसावी समाजाला अंत्यविधीसाठी दिली आहे
तसेच माननीय उच्च न्यायालयाने देखील सदर जागेत वृत्तांचे अंत्यविधी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे सदर जागी शेजारीच नातपंथीय रावळ समाजाची दफन भूमी व बेवारस स्मशानभूमी अगोदर पासूनच अस्तित्वात आहे. या दोन्ही ठिकाणी पृथ्वीवर अंत्यसंस्कार केले जातात असे असताना ख्रिस्ती व गोसावी समाजाचा दफनविधी व अंत्यविधीला विरोध केला जात आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे
तसेच या अगोदर देखील सदरील व्यक्तींकडून वारंवार दर्शक निर्माण करून दमदाटी व जातीवाचक शिवीगाळ करून ख्रिस्ती व गोसावी समाजाच्या मालकी हक्काच्या जागेवरून कुठलेही काम न करून देत नाही याकरिता संबंधित विभागातील पोलीस स्टेशनला याबाबत आदेश व्हावेत. तसेच या वरील व्यक्तींचे आमच्या जागेत संबंधित कुठलाही हित संबंध नसताना विनाकारण त्रास देण्याचे हेतूने व दशनाम गोसावी व ख्रिस्ती समाज या जात द्वेषातून प्रयत्न करत आहेत. अहमदनगर शहरामध्ये ख्रिस्ती व गोसावी समाज मोठ्या प्रमाणात आहे सिद्धार्थ नगर येथील ख्रिस्ती दफनभूमी ही जागा खाजगी मालकीची आहे. परंतु ती सुमारे 200 वर्षापासून वापरात असून भरलेली आहे व तेथील विश्वस्त मंडळ समाजातील इतर दोनशे चर्चेस च्या ख्रिस्ती बांधवांना अंत्यविधी करण्यास मनाई करण्यात आलेली आहे त्यामुळे दुःखद प्रसंगी अंत्यविधी करायचा कोठे असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
सदर जागेत ख्रिस्ती व गोसावी समाज बांधवांना अंत्यविधीस व दफन विधी विरोध करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई न झाल्यास नाईलाजाने दुखत प्रसंगी ख्रिस्ती व गोसावी समाजातील मृत बांधवांना अंत्यविधी जागा नसल्यामुळे अंत्यविधीसाठी शेव घेऊन आपल्या कार्यालयात यावे लागेल तरी वरील संवेदनशील प्रश्न आता आपण तातडीने लक्ष घालून विरोध करणाऱ्या व्यक्तींवर जातीवाद प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ऍट्रॉसिटी नुसार कायदेशीर कारवाई करावी. तसेच सदर जागेवर कर्मचारी सफाई चे काम करत आहेत. त्यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे. याकरिता आपणास नम्र विनंती आहे की मोजणीचे व सफाई चे काम संपेपर्यंत आम्हाला पोलीस संरक्षण मिळावे. त्या कामी नियमानुसार लागणारी शासकीय फी आणि ती आम्ही भरण्यास तयार आहोत कृपया ख्रिस्ती व दशनाम गोसावी समाजाला न्याय मिळावा. निवेदन देत्या वेळी अहमदनगर दि प्रिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष ताराचंद चक्रनारायण, गोसावी समाज चे अध्यक्ष बाबासाहेब गोसावी, सालोमन बोरगे, रवी चांदेकर, मदन खंडागळे, सुभाष वाघेल प्रकाश शेलार, संजय गायकवाड, अंजन कांबळे, महेश क्षीरसागर,
सागर गोसावी, कुलदीप गोसावी, दामोदर गोसावी, अशोक गिरी, गणेश पुरी, नंदकुमार गोसावी, मच्छिंद्र गोसावी, अतुल गोसावी, अशोक गोसावी, रमेश गोसावी, महादेव गोसावी, गणेशपुरी गोसावी, पांडवापुरी गोसावी, मनोहर गोसावी, शेषराव गिरी, प्रभाकर गोसावी, रंगनाथ गोसावी, प्रकाश गोसावी, समर्थ गोसावी आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा