Breaking

रविवार, २४ जुलै, २०२२

मातंग वस्तीत दुर्गंधीयुक्त घाणीचे साम्राज्य




 

मातंग वस्तीत दुर्गंधीयुक्त घाणीचे साम्राज्य



नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट


लोहा : लोहा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत व सर्कलचे गाव म्हणून ओळख असलेल्या उमरा येथे मातंग वस्तीतील मुख्य रस्त्यावर खड्डे पडल्याने व दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून वाहून नालीचे पाणी तुंबल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.त्याकडे ग्राम प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नाल्या तुंबल्या असून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरच साचत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 
                                                                   उमरा हे सर्कलचे गाव असून परिसरात सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे.येथे सध्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमलेला आहे.मात्र ग्रामसेवक व प्रशासकाच्या सोयीनुसार कामकाज सुरू असून ,मातंग वस्तीतील मुख्य रस्ता व गल्ली बोळातील नाल्या तुंबल्या असून त्या दुर्गंधीयुक्त पाण्याचा नागरिकांना त्रास होतो आहे.तर सदर पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने रस्त्यात चिखल व डासाची उत्पत्ती वाढली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.पावसाळ्याचे दिवस असून,रस्ते,नाल्या,स्वच्छ,ठेवण्याचे ग्रामपंचायतीचे काम असतांना तसे होतांना दिसत नाही.वारंवार ग्राम प्रशासक,ग्रामसेवक यांना नागरिकांनी सांगून देखील रस्ते, नालेसफाई अद्याप झालेली नसल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.                                                       " मातंग वस्तीतील मुख्य रस्ता व गल्लीबोळातील नाल्या तुंबल्या असून याकडे प्रशासक व ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्यानेच ,घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे ".बालाजी सिरसाट ( उमरा,ग्रामस्थ तथा संभाजी ब्रिगेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख )


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा