उमरा जिल्हा परिषद शाळेत शिक्षण परिषद संपन्न
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
लोहा : सुगाव केंद्रा अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरा ता.लोहा येथे २८-जुलै रोजी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद केंद्रप्रमुख बी.जी कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध व आनंददायी वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाली.
प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पिराजी ढगे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लोहा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के,माणिक जाधव,केंद्रीय मुख्याध्यापक तथा केंद्र प्रमुख बी. जी.कापसे,रामदास कस्तुरे, किरवले,व्यंकट पपुरवार ,बेटकर यांची उपस्थिती होती.गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी आनंददायी शिक्षण, शंभर टक्के उपस्थिती, एक तास वाचन उपक्रम, श्रुत लेखन, प्रभावशाली परिपाठ, पालक सभा, आदी विषयावर सखोल मार्गदर्शन करून आढावा घेतला.
प्रास्ताविक मुख्याध्यापक व्ही.व्ही.आमनवाड यांनी केले. आदर्श पाठाचे सादरीकरण ज्ञानरचनावाद अध्यापन तंत्रप्रमाणे सुलभक एम.डी.सिरसाट यांनी उत्तम असा ज्ञानरचनावाद पद्धतीने पाठ घेतला तर प्रवेश सादरीकरण सुलभक एम.व्ही.शितळे यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आर.आर.वंगलवार यांनी केले.तर शेवटी आभार एम.जी.मेथे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा