Breaking

शुक्रवार, २९ जुलै, २०२२

सर्वोच्च न्यायालयात शिंदे-फडणवीस सरकारची सुनावणी आता लांबणीवर*



सर्वोच्च न्यायालयात शिंदे-फडणवीस सरकारची सुनावणी आता लांबणीवर*       

     मुंबई मिलिंद माने    महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा येत्या 1 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात फैसला होणार असल्याची चर्चा होती. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांवर अपात्रेच्या कारवाईच्या मागणीवरुन मुख्य शिवसेनेकडून करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर 1 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे, असं मानलं जात होतं. पण ही सुनावणी आता लांबणीवर जाण्याती शक्यता आहे. राज्य सरकारबाबतच्या याचिकांवर 1 ऑगस्ट ऐवजी 2 ऑगस्टला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

           सुप्रीम कोर्टाच्या पुढच्या आठवड्यातील सुनावणींविषयी यादी येत असतात. या यादीनुसार 2 ऑगस्टला राज्य सरकारच्या फैसला संदर्भातील याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे घटनात्मक खंडपीठापुढे ही सुनावणी होणार अशी चर्चा होती. पण अजूनही घटनात्मक खंडपीठ स्थापन करण्यात आलेलं नाहीय. यापूर्वी 20 जुलैला सुनावणी झाली होती. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन वी रमन्ना, न्या कृष्ण मुरारी, न्या हिमा कोहली यांच्यासमोर ही सुनावणी झाली होती. पण कोर्टाने 1 ऑगस्टला सुनावणी होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.

       *घटनात्मक खंडपीठ हे 3, 5, 7, 11 न्यायाधीशांचं असतं. पण अद्यापही घटनात्मक खंडपीठ स्थापन करण्यात आलेलं नाही. केस लिस्टेड आहे. पण सुनावणी ही 1 ऑगस्ट ऐवजी 2 ऑगस्टला होण्याची शक्यता आहे.*

        या प्रकरणी 20 जुलैला सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत कोर्टाने काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले होते. "हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे, कलम 32 अंतर्गत दोन्ही गटांनी आधी हायकोर्टात जायला हवं होतं. या प्रकरणावर घटनात्मक खंडपीठापुढे सुनावणी झाली पाहिजे. जर आमदारांनी पक्ष सोडला आहे, तर फुटला कसा?", असे मुद्दे सुप्रीम कोर्टाने मांडले होते. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्टला सुनावणी होणार, असं स्पष्ट केलं होतं.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा