Breaking

शनिवार, ३० जुलै, २०२२

वाद टळले !, नाते जुळले !! *सोलापूर कौटुंबिक न्यायालयामुळे नवविवाहित जोडप्यांचा पुन्हा नव्याने संसार सुरू*- *अँड. श्रीनिवास कटकुर*


*वाद टळले !, नाते जुळले !! *सोलापूर कौटुंबिक न्यायालयामुळे नवविवाहित जोडप्यांचा पुन्हा नव्याने संसार सुरू---अँड.  श्रीनिवास कटकुर*


 *सोलापूर* इन्फोसिस  पुणे मध्ये  मॅनेजर  म्हणुन नोकरीस असलेले अर्जदार  सौ. प्रिया  माहेरचे राहणार -अवंती नगर सोलापूर यांनी दाखल केलेल्या पतीने नांदायला घेऊन जाण्याचे केसकामी मे. न्यायालयाने समन्स काढून पतीला चांगल्या प्रकारे  समुपदेशन केल्यामुळे  पतीने पत्नीला  नांदायला घेऊन गेले व दोघांमधील वाद टाळुन पुन्हा नाते जुळले. 

 *यात केसची सविस्तर हकीकत अशी की*

                                

 अर्जदार पत्नी सौ. प्रिया वय 25 शिक्षण - M.Tech टेली कम्युनिकेशन इंजिनिअर,  नोकरी - सध्या इन्फोसिस पुणे  मध्ये असि. मॅनेजर पदावर म्हणून नोकरीस असुन  त्यांचे माहेर अवंती नगर , सोलापुर येथे असून त्यांचे आठ महिन्यापूर्वी  डिसेंबर 2021 मध्ये सोलापूर येथे श्री सुजित ,  शिक्षण -M.E. सॉफ्टवेअर इंजिनिअर नोकरी -  Tata Consultancy sercices TCS मध्ये  मॅनेजर म्हणून कोथरूड पुणे येथे असून त्यांच्याशी प्रेम विवाह झालेला होता. व  लग्नानंतर चार महिने पतीने  पुणे येथे व्यवस्थित नांदविले व नंतर पतीने पत्नीचे आलेल्या पगारावरुन पैशावरुन व किरकोळ कारणावरून पत्नीस  वादविवाद करुन माहेरी सोलापुर येथे पाठवले व  पतीने नवविवाहित पत्नी सौ. प्रिया यांना नांदण्यास नकार देऊन माहेरी  पाठवून दिले व नंतर  पत्नी सौ. प्रिया यांनी स्वता: व त्पांच्या माहेरच्या लोकांनी प्रयत्न केले असता , त्पांना यश आले नाही म्हणुन  शेवटी न्याय मिळणेसाठी  अर्जदार पत्नी सौ. प्रिया यांनी सोलापुरातील नामवंत  विधीज्ञ अँड. श्रीनीवास कटकुर   यांच्यामार्फत  सोलापूर येथील मे. फॅमिली कोर्टात हिंदू  मॅरेज अँक्ट  1955 कलम 9 अन्वये सामनेवाला पती श्री सुजित रा. पुणे  यांच्याविरुद्ध Restitution of Conjugal Rights नांदायला घेवुन जाणेबाबतची  केस  सोलापूर येथील मे.  फॅमिली कोर्टात पत्नीतर्फै दाखल केली व सदर केसकामी सोलापुरातील मे फॅमिली कोर्टाने सामनेवाला  पती श्री सुजित यांच्याविरुद्ध समन्स जारी  करून सुनावणी कामी हजर राहण्याचा आदेश दिला व  पती पुण्याहुन सोलापूर येथे मे. फँमिली  कोर्टात हजर  झालेवर मे. फँमिली  कोर्टाने उभय नवदांपत्यांच्या समुपदेशन व  सल्ल्यामुळे  पतीने पत्नीस  चांगला प्रकारे नांदविण्याची लेखी देवुन आनंदाने नांदविण्यास  घेऊन गेला.  त्यामुळे नवविवाहीत  जोडप्यांचा संसार पुन्हा नव्या जोमाने सुरू झाला व याकामी सोलापूर येथील मे फॅमिली कोर्ट व विधीज्ञ  अँड. श्रीनीवास कटकुर  यांच्या विशेष  प्रयत्नामुळे  पुढील मोठा वाद टळला व पुन्हा नातेसंबंध  जुळले  .व उभय जोडप्यांमध्ये व व परिवारमध्ये व नातेवाईकांमध्पे  आंनदाचे वातावरण पसरले. 
*याकामी नवविवाहीत पत्नी  अर्जदार सौ. प्रिया यांच्या वतीने एस. के .लाॅ. असोसिएटसचे अँड. श्रीनीवास कटकुर,  अँड. किरण कटकुर व अँड. आनंद  सागर यांनी काम पाहिले*


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा