Breaking

शनिवार, १३ ऑगस्ट, २०२२

गोदावरी अर्बनच्या “हर ब्रॅच तिरंगा” उपक्रम प्रतिसादव्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर; यांची माहिती



गोदावरी अर्बनच्या “हर ब्रॅच तिरंगा” उपक्रम प्रतिसाद


व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर; यांची माहिती

नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

नांदेड : या वर्षी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "हर घर तिरंगा" अभियानात प्रत्येक नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून गोदावरी अर्बन परिवाराने देखील "हर घर तिरंगा" अभियानांतर्गतन गोदावरी अर्बनच्या पाच राज्यातील ९१ ब्रँचमध्ये हर ब्रँच तिंरंगा हा उपक्रम उत्स्फूर्तपणे राबविल्याची गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी माहिती दिली.
                 गोदावरी अर्बनचे संस्थापक तथा हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील, गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाच राज्यातील गोदावरीच्या ९१ शाखांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला असून, तरोडा नाका येथील गोदावरी अर्बनच्या सहकारसूर्य या मुख्यालयाचे कार्यालयात शनिवारी (ता.१३) हा उपक्रम मोठ्या उत्साहत साजरा करण्यात आल्याचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी सांगितले आहे.  पुढे ते म्हणाले की, गोदावरी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटी लि.च्या महाराष्ट्रासह, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात व कर्नाटक या पाच राज्यातील ९१ शाखांमध्ये नियमितपणे सांस्कृतीक व समाजपयोगी उपक्रम राबविले जातात. यंदा भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त आजादी का अमृत महोत्सव हा उपक्रम देशातील सर्व राज्यात व केंद्रशासित प्रदेशात १२ मार्च २०२१ पासून पुढील ७५ आठवडे राबविण्यात येत आहे. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत विविध कार्यकर्माचे आयोजन करावयाचे आहे. याच धर्तीवर गोदावरी अर्बनच्या वतीने देखील हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत राष्ट्रीय ध्वजाचे वाटप करण्यासोबतच राष्ट्रीय ध्वजाचा कुठल्याही प्रकारचा अवमान होणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेऊन हा "हर ब्रँच तिरंगा" उपक्रम मोठ्या उत्साहत सांजरा करण्यात आला. गोदावरी अर्बनचे संस्थापक तथा हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील, गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील व व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी अर्बन सहकारी मल्टीस्टेट को. आपरेटिव्ह सहकारी पतसंस्थेच्या वतीने गोदावरी अर्बनच्या पाच राज्यातील ९१ शाखांमध्ये हर ब्रँत तिरंगा हा उपक्रम राबविण्यात आला. यास चांगलाच प्रतिसाद मिळाला.
या प्रसंगी गोदावरी अर्बन मुख्यालय मुख्य व्यवस्थापक सुरेखा दवे,  मुख्यालयाचे मुख्यालय प्रधान व्यवस्थापक विजय शिरमेवार, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक रवी इंगळे, विपणन व्यवस्थापक महेश केंद्रे, शाखा व्यवस्थापक सर्वश्री भारत राठोड , विनोद आदे , धनंजय क्षीरसागर, विजय मोडक , अनिरुद्ध पाथ्रडकर, राहूल कोल्हे ,  शिवराज वल्लेवाड , पंकज ईंदूरकर , गणेश जाधव, अशोक चोपडे, अरविंद महाजन  मुख्य शाखा व्यवस्थापक अविनाश बोचरे पाटील,  चिखलवाडी  शाखेचे  गुरुतेज सिंग, गोपाल जाधव लेखा विभाग प्रशांत कदम , देविदास पोळकर , आयटी विभाग पवन यादव यांच्यासह मराठवाडा आणि विदर्भातील गोदावरी अर्बनचे शाखाप्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा