स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निम्मित श्रीगोंदा मध्ये रक्तदान शिबिर संपन्न
श्रीगोंदा-नितीन रोही,
◆ श्री स्वयंभू युवा प्रतिष्ठान श्रीगोंदा व पोलिस स्टेशन श्रीगोंदा यांच्या संयुक्त विदयमाने रक्तदान शिबिर निमित्त ७५ रक्तदात्यांनी रक्तदान करून योगदान दिले
श्री स्वयंभू युवा प्रतिष्ठान श्रीगोंदा व पोलिस स्टेशन श्रीगोंदा यांच्या संयुक्त विदयमाने तुळशीदास मंगल कार्यालय या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन श्रीगोंदा पोलीस स्टेशन चे API महेश जाणकार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीगोंदा शहराचे नगराध्यक्ष मा.सौ.शुभांगीताई पोटे होते या प्रसंगी श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे, सावता परिषद तालुका अध्यक्ष राजुदादा गोरे, जनसंकल्प फाउंडेशन चे संस्थापक महेश भोर पाटील यांचे मनोगत पर भाषण झाले याप्रसंगी उपस्थित श्रीगोंदा तालुक्याचे तहसिलदार मिलिंद कुलथे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नितीन खामकर, अरिहंत उद्योग समूहाचे मा.सौ. प्रतिभा गांधी, सनराईज कॉलेज चे प्राचार्य मा.सौ. राजश्री शिंदे, समाजसेवक आप्पासाहेब सोनवणे,नगरसेवक सतीश मखरे सर, महाराजा कॉलेज प्राचार्य ज्ञानदेव म्हस्के सर, रोटरी क्लब चे.डॉ. राजेश दाते, अमीर शेख, तुळशीदास उद्योग समूह चे अध्यक्ष प्रशांत दादा गोरे, पोलिस नाईक संदीप पितळे आणि श्री स्वयंभू युवा प्रतिष्ठाण श्रीगोंदा परिवार हे या प्रसंगी उपस्थित होते.
सदर शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास श्रीगोंदा बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त एक वृक्ष भेट स्वरूपात देण्यात आले.
याप्रसंगी कौटिल्य करियर अकॅडमी, तुळशीदास उद्योग समूह, अजयशेठ भंडारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शिबिराचे प्रास्ताविक सौरभ राऊत यांनी केली तर सूत्रसंचालन प्रसाद टकले सर व आभार सागर नगरे यांनी मांडले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा