Breaking

मंगळवार, २ ऑगस्ट, २०२२

वाफेगाव बंधाऱ्यावरून दुचाकी पडून चालक मृत्यूमुखी ...



वाफेगाव बंधाऱ्यावरून दुचाकी पडून चालक मृत्यूमुखी ...



बेंबळे प्रतिनिधी:  बेंबळे येथील कोल्हापूर पध्दतीच्या वाफेगाव बंधाऱ्यावरून दुपारी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास दुचाकी घसरून नदीपात्रात कोसळल्याची घटना घडली. सदर घटनेत दुचाकीस्वार समाधान कोळी (वय ३०) यांचा जागीच मृत्यू झाला. संबंधित घटनेची नोंद टेंभुर्णी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

बेंबळे  आणि माळशिरस तालुक्यातील वाफेगावला  जोडणाऱ्या कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यावरून अकलूजसाठी जवळचा मार्ग असल्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात वाहने ये-जा करत असतात. हा बंधारा अरुंद आहे. तसेच पुलाच्या दोन्ही बाजूंना सुरक्षा कठडे सुद्धा नाही. यावरून वाहतूक करताना कायम धोका असतो. एका वेळी एकच वाहन यावरून जाऊ शकते. अनेकवेळा काहीजण खाली पडता पडता वाचले आहेत. प्रथमच  पुलावरून गाडी खाली पडल्याची घटना घडली आहे. दुचाकीस्वार बेंबळे वरून वाफेगावला जात असताना ही घटना घडली. या घटनेमुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दोन्ही बाजूला सुरक्षा कठडे बसविण्याची स्थानिकांतून मागणी होत आहे.

 दरम्यान मयत समाधान कोळी यांच्या पश्चात पत्नी,  लहान एक मुलगी व मुलगा व भाऊ असा परीवार आहे.  या घटनेमुळे बेंबळे गावावर शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा