माजी सैनिकांचा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काष्टी येथील प्राथमिक शाळेत सन्मान...
श्रीगोंदा-नितीन रोही,
भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काष्टी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शाळेमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले 11 ऑगस्ट रोजी प्रभात फेरीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. यावेळी वेगवेगळे पारंपरिक पोशाख घालून, वेगवेगळी वेशभूषा करून तिरंगी ध्वज हाती घेऊन मुलांनी काष्टी गावातून अत्यंत उत्साहात घोषणा देत प्रभात फेरी काढली.याच दिवशी निबंध स्पर्धा घेण्यात आल्या .12 ऑगस्टला चित्रकला आणि वकृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते हर घर तिरंगा या अंतर्गत सर्व शालेय विद्यार्थ्यांना तिरंगी ध्वजाचे वाटप करण्यात आले आल्या.13 ऑगस्टला ध्वजारोहण आणि स्वच्छता मोहीम राबविण्यात आली
तसेच रांगोळी स्पर्धा ही घेण्यात आल्या .14 ऑगस्ट ला ध्वजारोहणानंतर शाळेमध्ये महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपसरपंच प्रतिभाताई रवींद्र दांगट यांनी भूषविले. यावेळी अनेक महिला यामध्ये सहभागी झाल्या होत्या .यावेळी डॉक्टर सुजाता पाचपुते यांनी महिलांचे आरोग्य , मनीषा राऊत मॅडम यांनी स्वातंत्र्य चळवळीतील महिलांचा सहभाग, मैत्रिण गृपच्या अध्यक्षा श्रीमती आशा खोसे मॅडम यांनी मातांचे कर्तव्य, सुवर्णाताई पाचपुते यांनी महिला सबलीकरण या विषयांवर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा गायकवाड मॅडम यांनी केले
15 ऑगस्ट रोजी शाळेमध्ये उपसरपंच प्रतिभाताई रवींद्र दांगट यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात पालकांनी सहभाग घेतला याप्रसंगी काष्टी पंचक्रोशीत असणाऱ्या सर्व आजी-माजी सैनिकांचा सन्मान शाळेच्या वतीने करण्यात . या सोहळ्यासाठी ग्रामपंचायत सदस्य मेजर चांगदेव पाचपुते यांचे अनमोल सहकार्य लाभले .आजी-माजी सैनिकांच्या वतीने शाळेच्या अष्टपैलू मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता वाजे मॅडम यांचा सत्कार करण्यात येऊन सर्व सैनिकांच्या वतीने शाळेसाठी 11 हजार रुपयांची रोख देणगी देण्यात आली.
या अमृत महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या 51 विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात विविध गुणदर्शन आणि देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करण्यात आले या वेळी पंचायत समिती सदस्य अमोल पवार , माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाचपुते,ग्रामपंचायत सदस्य संदीप महाराज पाचपुते,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल पाचपुते उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब पवार डॉक्टर पांडुरंग दातीर, सामाजिक कार्यकर्ते सुनील पाचपुते, थोर देणगीदार गणेश पालकर , शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शिवाजी धुमाळ,काळू दांगट, लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे एक्सलंट टीचर अवार्ड 2021 पुरस्कार विजेते जनता विद्यालय काष्टी येथील सेवा निवृत शिक्षक निवृत्ती शेलार, महेश सरोदे आदी कार्यकर्ते कार्यक्रमास उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतोष नगरे सर आणि पुष्पा रासकर मॅडम यांनी केले .
दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायन घेण्यात आले . यात पालक देखील सहभागी झाले.
दिनांक 11ऑगस्ट ते 18 ऑगस्ट या कालावधीत बाळ गोपाळांची पंगत या उपक्रमांतर्गत महेश्वर पंतसंस्थेचे संस्थापक चेअरमन श्री दत्तात्रय गावडे, वैशाली सतिश कुतवळ, सुनीता बाळासाहेब शिंदे , मेहबूब शेख यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना फळाचे वाटप करण्यात आले.यानंतर वृक्षारोपण करून या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी उपक्रमाची सांगता झाली
हे सर्व उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरीता सर्व शिक्षकवृदांनीअथक परिश्रम घेतले. या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वाचे मंगल भुकन मॅडम यांनी आभार मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा