लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
कुर्डूवाडी शहर प्रतिनिधी: aj24Taas News
साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 102 व्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.जयंत्ती निमित्त अण्णा भाऊ साठे चौक कुर्डुवाडी येथे गायक कृष्णा पाटोळे व राणी मस्के यांचा गायणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात आण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित गाणी व पोवाडे सादर करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक नितीन पवार, प्रदीप सोनटक्के, अरविंद पवार उपस्थित होते.
, यावेळी संतोष क्षीरसागर,दत्ता अडसूळ, अशोक चव्हाण,लक्ष्मण अस्वरे, रणधीर लोंढे,शिवा खवळे, सुनील अस्वरे, दीपक अस्वरे, महादेव गायकवाड, अमोल ढावरे, बंटी हनवते, अबीषेक काळे, शरद ढावरे, सागर बंडपट्टे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन बंटी अस्वरे, सुरज अस्वरे, रवि पाटोळे, अतिश भालके,मोहन लोंढे, अमन कांबळे, रोहित कांबळे,अजय अस्वरे, संकेत देवकते, ओंकार पवार,इम्रान बागवान यांनी केले यावेळी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा