अखेर ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपीस अटक पूर्व जामीन मंजूर...
श्रीगोंदा-नितीन रोही
जिल्हा सत्र न्यायालय यांनी अखेर ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपी कानिफनाथ जगताप यांस अटक पूर्व जमीन मंजूर केला.
अर्जदार /आरोपी याचे विरुद्ध दि.13/6/2022 रोजीच्या घटनेची दि. 27/6/2022 रोजी जामखेड पोलीस स्टेशन येथे अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध (ऍट्रॉसिटी ऍक्ट) व भारतीय दंड संहिता नुसार गुन्हा दाखल केला. यानंतर आरोपीने अटक पूर्व जामीन मिळण्यासाठी श्रीगोंदा जिल्हा न्यायालयामध्ये धाव घेतली. जिल्हा न्यायाधिश नितीन शुक्ल साहेब यांनी आरोपीच्या अटकपूर्व जमीन अर्जावर सुनावणी घेत मूळ फिर्यादीचे म्हणणे एकूण घेतले.त्याच बरोबर सरकार पक्षातर्फे युक्तिवाद ऐकून डी. वाय. एस. पी. साहेब यांना आरोपीची अटक का पाहिजेत? याची संपूर्ण बाजू ऐकून घेऊन अर्जदार/ आरोपी तर्फे अधिवत्ता अँड श्री प्रसाद एस. गुंजाळ यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून अखेर 02/08/2022 रोजी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला,सदर अर्जदारच्या जामीन अर्जावर वाघा गाव आणि जामखेड तालुक्या सह अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा