बेंबळे ग्रा.पं.च्या पहिल्या महिला सरपंच पद्मिनी भोसले यांचे निधन....।
दिलीपराव भोसले यांना मातृषोक...
बेंबळे। प्रतिनिधी। फोटो
बेंबळे ग्रामपंचायतच्या पहिल्या महिला सरपंच श्रीमती पद्मिनी अण्णासाहेब भोसले यांचे रविवारी, दिनांक 28 ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजता अल्पशा आजाराने निधन झाले, त्या 77 वर्षाच्या होत्या. स्वर्गीय पद्मिनी भोसले या सर्वत्र 'आक्का' या नावाने प्रसिद्ध होत्या.सन 1997 ते 2002 पर्यंत त्या बेंबळे ग्रामपंचायतीच्या पहिल्या महिला सरपंच होत्या. त्यांनी आपल्या राजकीय व सामाजिक जीवनामध्ये विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालीका, सहकारी दूध संस्थांच्या संचालिका व तसेच ग्रामीण महिला बचत गटाच्या प्रमुख सल्लागार सदस्या म्हणून मोठे कार्य केले आहे. माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दिलीपराव अण्णासाहेब भोसले यांच्या त्या मातोश्री होत. स्वर्गीय पद्मिनी आक्कांचा मनमोकळा स्वभाव व त्यांचे सामाजिक कार्य यामुळे त्यांचा सर्वत्र लौकिक होता. त्यांच्या निधनाने ग्रामीण भागातील एक कर्तबगार, राजकीय व सामाजिक महिला कार्यकर्त्यीस बेंबळे परिसर मुकला आहे. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले ,एक मुलगी सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे, त्यांच्या अंत्ययात्रेस विविध स्तरातील सामाजिक व राजकीय स्त्री पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा