वडूज नगरपंचायत येथे स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.
*सातारा प्रतिनिधी :-रविना यादव.*
(वडूज)-१५ आँगस्ट स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वडूज नगरपंचायत येथे मोठ्या उत्साहात साजरा साजरा करण्यात आला.७५ व्या स्वातंत्र्य महोत्सवानिमित्त मा.सौ.मनिषा काळे नगराध्यक्षा ,वडूज यांच्या हस्ते नगरपंचायत इमारत वडूज येथे सकाळी ठिक ७:१५ वा ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सर्व नगरसेवक तसेच नगरसेविका उपस्थित होत्या. त्याचबरोबर सकाळी ठिक ८.०५ वा.हुतात्मा स्मारक येथे शासकिय ध्वजारोहण कार्यक्रम तसेच विविध स्पर्धा व विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
नगरपंचायत वडूज येथे दि.१०/०८/२०२२. रोजी १५ किलोमीटर भव्य सायकल रँली काढण्यात आली. तसेच हर घर तिरंगा या उपक्रमाची माहिती देत पदयात्रा काढण्यात आली.त्याचबरोबर वृक्षारोपण कार्यक्रम,स्वच्छता मोहीम ,तसेच दि.१२/०८/२०२२ रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
१५ आँगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त वडूज नगराध्यक्षा मा.सौ.मनिषा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १०:३० वाजता स्वातंत्र्य सेनानी उत्तराधिकारी यांचे पदाधिकारी यांचा सन्मान सोहळा, वीरजवान माता सन्मान, राज्यसेवा परिक्षा उत्तीर्ण झालेल्या वडूज नगरातील गुणवंतांचा सन्मान, शाहिर राजेंद्र सानप यांची "स्वातंत्र्याची अमृत शाहिरी" पोवाडा गायन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमास वडूज नगराध्यक्षा मनिषा काळे तसेच सर्वच नगरसेवक नगरसेविका , स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे अध्यक्ष बंडा गोडसे सर ,उपाध्यक्ष विश्वासभाऊ काळे ,नगरपंचायतीचे अधिक्षक अजिंक्य वनमोरे ,शशिकला ताई देशमुख,विजया बाबर,तसेच सन्मानमुर्ती महादेव सिताराम गोडसे,प्रमोद श्रीरंग राऊत,विनायक मोहन ठिगळे,विशाल प्रभाकर टाकणे,विक्रमसिंह तात्यासाहेब काळे,रणजित नामदेव गोडसे,शंकर दगडू हिंगसे ,जितेंद्र शहा,वीरजवान माता रंजना काळे,राज्यसेवा परिक्षा उत्तीर्ण ऐश्वर्या गोडसे ,गुणवंत विद्यार्थींनी रविना आनंदकुमार यादव,त्याचबरोबर प्रशासकीय सेवा उत्तम केल्याबद्दल सेवानिवृत्त सौ.विजया बाबर सन्मान, प्रशासकीय अधिकारी ते कलावंत शाहीर राजेंद्र सानप,यांना विशेष सन्मानचिन्ह शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा मनिषा काळे म्हणाले की,स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त नगरपंचायतीचा माध्यमातून आपण अनेक स्पर्धा व उपक्रम राबविले.आणि सर्व नगरसेवकांनी ,नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी बंधू भगिनींनी एकजूटीने कार्य पार पाडले व सर्वांचा परिश्रमाने या विविध कार्यक्रमास उस्फुर्त प्रतिसाद ही मिळाला.प्रत्येक राष्ट्रीय सनानिमित्त ही पंरपरा अखंड चालू ठेवून अनेक उपक्रम राबविले जातील असे आश्वासन दिले.
या कार्यक्रम प्रसंगी मा.बंडा गोडसे सर,विश्वास भाऊ काळे,रविना यादव, ऐश्वर्या गोडसे,विजया बाबर,विनायक ठिगळे,यांनी मनोगत व्यक्त केले.नगरसेवक अभयकुमार देशमुख यांनी ही नगरपंचायतीचा वतीने स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व गुणवंतांना शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रम प्रसंगी मुख्याधिकारी अमित पंडीत उपस्थित नसतानाही नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांनी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद जगदाळे यांनी केले व आभार नगराध्यक्षा मनिषा काळे यांनी केले.
या कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नगरपंचायतीचा सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा