Breaking

गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२

शेवरे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन.


शेवरे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन.


टेंभुर्णी प्रतिनिधी

 शेवरे ता.माढा.येथे 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व शंभू महादेव चरणी महा अभिषेक शेवरे गावामध्ये ग्रामपंचायत मध्ये करावयाचा आहे परंतु महा अभिषेक दूध आणि दह्याचा नाही तो रक्ताचा आहे म्हणजे रक्तदान करायचे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी  स्वराज्य निर्माण करण्यासाठी शंभू महादेवाच्या पिंडीवर करंगळी कापून रक्ता अभिषेक केलेला होता.
        रक्ताभिषक करत असताना सर्व जनतेच्या अठरापगड जातीच्या हिताचे रक्षण करण्यासाठी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी शपथ घेतलेली होती याच प्रेरणेने शेवरे येते दिनांक 25/8/2022 रोजी रक्तदान शिबिर घेतले असून आपले रक्त हे देशासाठी देश बांधवांसाठी व आजारी पडलेले समाज बांधव मृत्यू झुंज देत असताना त्यांना खरी रक्ताची गरज आहे आणि आपले रक्त दिल्यामुळे देश बांधव असा समाजातील व्यक्तींना आपण शंभू महादेव चरणी प्रार्थना करून रक्तदानाचे पवित्र काम व एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी आपण रक्तदान करत आहोत शंभू महादेव चरणी श्रावण महिन्यात देश बांधवांसाठी समाजामधील आजारी असताना मरणाच्या वेतना सहन करत असताना रक्ताची गरज असते म्हणून आपण एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी रक्तदान करत आहोत शेवरे ग्रामस्थांनी हा विचार घेऊन 25/8/2022 रोजी सकाळी 10:30 वाजता ग्रामपंचायत शेवरे या ठिकाणी येऊन पवित्र रक्तदानाचे काम सर्वांनी मिळून करायचे आहे ही सर्वांना माझी नम्र विनंती आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा